सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गणेशोत्सव आणि मोहरम साधेपणाने साजरे करावेत -जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दि.22 ऑगस्ट पासून सुरू होणारा गणेशोत्सव तसेच 21 ऑगस्ट पासून सुरू होणारा

Sudarshan MH
  • Aug 21 2020 11:18AM
पालघर :- (मनीष गुप्ता )  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दि.22 ऑगस्ट पासून  सुरू होणारा गणेशोत्सव तसेच 21 ऑगस्ट पासून सुरू होणारा मोहरम शासन नियमांप्रमाणे तसेच साधेपणाने साजरे करावेत असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

दि.19 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यातील कोव्हीड 19 चा आढावा घेण्यासाठी तसेच गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित केली होती.

या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हीड-19 च्या काळात सर्व धर्मिक सण साधेपणाने साजरे करावेत आणि आतापर्यंत जनतेने  सहकार्य केले आहे, त्याचप्रमाणे आता गणेशोत्सव आणि मोहरम साठीही सहकार्य करावे. तसेच हे सण साजरे करताना कोव्हीड चा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन या व्हीसी द्वारे केले.

या कॉन्फरन्स मध्ये केलेल्या सूचनांप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी  मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र येणार असून ज्याप्रमाणे ईद व इतर सण घरात राहून साजरे केले त्याचप्रमाणे गणेशोत्सव देखील घरगुती पद्धतीने साजरा करावा.सार्वजनिक गणपती मूर्ती बसवण्यासाठी आपल्या हद्दीतील पोलीस स्थानकाची परवानगी घेऊन सार्वजनिक गणपती मूर्ती ४ फूट तर घरगुती गणपती मूर्ती २ फूट असावी. गणपती मंडळाच्या जाहिराती ,देखावे हे सामाजिक संदेश देणारे असावेत, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याऐवजी आरोग्य विषयक  उदा.आरोग्य तपासणी शिबिर, रोगनिदान शिबीर असे उपक्रम राबवावेत.

गणपती मंडळांनी जेथे गणेश मूर्ती बसवण्यात येतील त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून   मास्क, सॅनिटायजर्स यांची व्यवस्था करण्यात यावी. विसर्जनाच्या आधीची आरती विसर्जना वेळी न करता घरीच करावी, सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात कृत्रिम तलाव तयार करून शक्यतो  तेथेच गणपती विसर्जन करण्यात यावे. याची अंमलबजावणी होणे गरजेचे असून कुठल्याही प्रकारची मिरवणुक काढण्यात येऊ नये. कमीत कमी दोन व्यक्तींना विसर्जन करण्यासाठी जाता येईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या व्ही. सी. द्वारे स्पष्ट केले.

तसेच मोहरम साजरा करतांना देखील कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येऊ नये.

अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत त्या सूचनांचे पालन करण्यात यावे. तसेच प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्तरावर देखील या सूचनांचे पालन करण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार