सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात 2 दिवसीय ई- आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

दिगंबरराव बिंदू महाविद्यालया

Sudarshan MH
  • Aug 20 2020 7:43PM
भोकर दि.२०(अरविंद जाधव) येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात 2 दिवसीय  शाश्वत  विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यांचे योगदान 2020 ई- आंतरराष्ट्रीय परिषद  दि. 17/08/2020 ते 18/08/2020 रोजी संपन्न झाली. सदरील आंतरराष्ट्रीय परिषद प्राणीशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी दिगंबरराव बिंदू स्मारक समिती चे अध्यक्ष व माजी गृह राज्यमंत्री म. राज्य. डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  समन्वयक डॉ. अरविंद चव्हाण यांनी केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांनी महाविद्यालयाची ओळख करून दिली. उद्घाटन प्रसंगी बोलताना कुलगुरू  महोदय म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चा करता येते तसेच अशा प्रकारच्या परिषदेत ज्ञानाची देवाणघेवाण होत असते. ग्रामीण भागात असूनही अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले. डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांनी  शास्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान याचे महत्त्व विषद केले. आजच्या या बिकट परिस्थितीतून आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान कडून फार अपेक्षा आहेत. लवकरच जगातील वैज्ञानिक यावर तोडगा काढतील, विज्ञान व तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. प्रशांत टाके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. संग्राम पंडित यांनी केले.
परिषदेच्या पहिल्या सत्रात भोपाळ येथील शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र कुमार वर्मा यांनी Enzyme Promiscuity:An opportunity in extend commercial application of enzymes या विषयावर सादरीकरण केले. दुसऱ्या सत्रात कॅनडा येथील डॉ. मुमताज एम बेग यांनी SARS Cov-19 Pandemic in India: A Genomic insight या विषयावर आपले सादरीकरण केले. तिसऱ्या सत्रात ऑकलंड न्यूझीलंड येथील शास्त्रज्ञ  डॉ. मोनिका उत्तरवार यांनी Artificial Intelligence या विषयावर आपले विचार व्यक्त केले. चौथ्या व शेवटच्या सत्रात  सहभागी झालेल्या लोकांनी विविध विषयांवर सादरीकरण केले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात  नार्थ कॅरोलिना अमेरिका येथील शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र देशपांडे यांनी Experimental system for cancer research: cell lines and animal models या विषयावर आपले संशोधन सादर केले. दुसऱ्या सत्रात आबासाहेब गरवारे काॅलेज पुणे येथील प्राध्यापक डॉ. राजन वाल्हे यांनी Probiotic and COVID 19 या विषयावर चर्चा केली. शेवटच्या सत्रात यशवंत काॅलेज नांदेड येथील प्राध्यापक व अध्यक्ष प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ डॉ. एस. एस. ननवरे  यांनी Parasites of Human Health Welfare या विषयावर आपले विचार व्यक्त केले. शेवटच्या सत्रात सहभागी लोकांनी आपले संशोधन लेख सादर केले. समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांनी या दोन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर झालेल्या सादरीकरणाचे विश्लेषण केले तसेच सहभागी झालेल्या सर्व लोकांनी सुद्धा आपल्या मार्फत जनकल्याण व्हावे असे संशोधन करावे असे नमूद केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, इंडोनेशिया, इराक, नेपाळ, सुदान, थायलंड, इथोपिया, नायजेरिया ईत्यादी देशातील व भारतातील जवळपास सर्वच राज्यातून एकूण 650 लोक सहभागी झाले होते. या परिषदेचे आयोजन डॉ. पंजाब चव्हाण- मुख्य आयोजक, डॉ. अरविंद चव्हाण -समन्वयक, डॉ. सचिन तावडे - सह समन्वयक,  डॉ. जयवर्धन बलखंडे - आयोजन सचिव व डॉ. दिपक भुसारे - सह  आयोजन सचिव व संपूर्ण विज्ञान शाखा दिगंबरराव बिंदू महाविद्यालय यांनी केले होते. परिषदेची सांगता डॉ. अरविंद चव्हाण यांनी आभार प्रदर्शनाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार