सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रास्ता रोको करणाऱ्या निलेश सांबरेसह अन्य जणांवर ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल.

वाडा - वाडा-भिवंडी राज्यमार्गावर बुधवारी (१८ ऑगस्ट) रास्ता रोको

Sudarshan MH
  • Aug 19 2020 7:55PM

 

वाडा - वाडा-भिवंडी राज्यमार्गावर बुधवारी (१८ ऑगस्ट) रास्ता रोको करणारे जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष व पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्यासह १५० जणांवर वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी आंदोलनात भाग घेणाऱ्या ३० जणांची नावे पोलिसांनी प्राथमिक अहवालात नोंदविली असून त्यापैकी १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या अटक केलेल्या १३ आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या सर्व आंदोलकांवर भादविसं कलम ३५३ सह अन्य कलम, साथ रोग प्रतिबंधक कलम व आपत्ती व्यवस्थापन कलम या कलमाद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रास्ता रोको करणाऱ्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.
       
वाडा-भिवंडी मार्गाची सध्या दुरवस्था झाली असून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी व अन्य मागण्यांसाठी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष व पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी वाड्यातील कुडूस येथे रास्तारोको आंदोलन करत राज्यमार्ग रोखून धरला होता. या आंदोलना दरम्यान वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला तसेच कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा जमाव जमवून रास्ता रोको केल्याबाबत निलेश सांबरे यांच्यासह अन्य १५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार