सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दि. १९ ऑगस्ट २०२० अभाविपने 4 टप्प्यात मध्ये शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी केले तीव्र आंदोलन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच विद्यार्थी हित जोपासत काम करत आलेली आहे

Sudarshan MH
  • Aug 19 2020 3:14PM
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच विद्यार्थी हित जोपासत काम करत आलेली आहे. या कोविड-१९ च्या काळात सर्वच क्षेत्रात समस्या निर्माण झाल्या आहेत त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत. विविध शैक्षणिक समस्यांबाबत वेळोवेळी विद्यार्थी परिषदेने राज्य शासनाचे व विद्यापीठाचे लक्ष वेधून दिले, यातील सर्वात महत्वाची समस्या म्हणजे शैक्षणिक प्रवेश शुल्क एक रकमी भरणे. लॉकडाऊनमुळे बऱ्याच पालकांच्या रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या असल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तरीसुद्धा अनेक महाविद्यालय संपूर्ण फी भरायला विद्यार्थ्यांना भाग पाडत आहेत.
शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांना ४ टप्प्यांमध्ये भरण्याची मुभा देण्यात यावी. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता शैक्षणिक शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी. विद्यार्थी ज्या सोयी सुविधांचा वापर करत नाही त्याचे शुल्क आकारण्यात येऊ नये. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांचे  परीक्षा शुल्क परत करण्यात यावे अशा मागण्या अभाविपने केल्या  आहेत. आज या सर्व मागण्यांना  घेऊन कोंकण प्रांतातील सर्व जिल्ह्यांमध्ये भीक मांगो आंदोलन झाले. 
"वारंवार निवेदने देऊन, भेटूनसुद्धा हा प्रश्न मार्गी न लागल्याने विद्यार्थी परिषदेने विद्यापीठा विरोधात भीक मांगो आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. जो पर्यंत हे प्रश्न मुंबई विद्यापीठ सोडवत नाही तो पर्यंत विद्यार्थी परिषद विद्यार्थी हितासाठी लढत राहील." असे मत कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी व्यक्त केले. 

(हे प्रसिद्धीपत्रक कोंकण प्रदेश कार्यालय मंत्री श्री. प्रणय वंडेकर यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार