कोरोना वर जर मात करावयाची असेल तर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे कोरोना वर जर मात करावयाची असेल तर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे
पालघर :- कोरोनाच्या रुपाने आपल्यावर कोसळलेल्या संकटाचा आपण एकत्रितपणे जिद्दीने सामना करीत आहोत.संकटाचे स्वरुप अतिशय वेगळे आणि दिर्घकालीन आहे. सद्य परिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७५ टक्के असले तरी उशीराने उपचार घेतल्याने मृत्युचे प्रमाण वाढत आहे. या बाबीचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.
रोग झाल्यानंतर उपचार वा उपाययोजना करण्यापेक्षा रोग होऊच नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे केव्हाही चांगले, म्हणून जर कोणावर मात करायची असेल तर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक अंतर Social Distancing, वैयक्तिक स्वच्छता (Self Hygiene- Use of Mask & Hand Washing), सार्वजनिक स्वच्छता (Social Hygiene) या त्रिसुत्राचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे .कोणत्याही व्यक्तिस ताप, कोरडा खोकला,उल्टी, श्वास घेण्यास त्रास, अंग दुखी, तोंडाला चव नसणे इ. लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड केअर सेंटर (CCC) ला भेट देऊन कोरोना आजाराची तपासणी करुन घ्यावी.
खाजगी वैद्यकिय व्यवसायिक यांना आवाहन करण्यात आले की आपल्याकडे
येणा-या रुग्णांपैकी कोरोनाची लक्षणे असणा-या रुग्णांना कोविड केअर सेंटर (CCC) ला संदर्भित करुन सदर रुग्णाची माहिती तात्काळ शासकिय आरोग्य यंत्रणेस कळवावी. उपरोक्त सर्व बाबींची अंमलबजावणी काटेकोर पणे केल्यास कोरोना प्रादुर्भावास आळा बसेल व कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये आपण विजय मिळवू याची खात्री आहे. असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प