ढवळे रूग्णालयात 50 खाटांच्या कोविड कक्ष सुरू ...
पालघर : ऑगस्ट 2020, पालघर जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील वाढत्या कोरोनाच्या
पालघर : ऑगस्ट 2020, पालघर जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ढवळे रूग्णालय, पालघर येथे 50 खाटांच्या कोविड कक्षाचे उदघाटन आज सोमवार दि. 17 ऑगस्ट 2020 रोजी, शिवसेना खासदार मा. खासदार श्री. राजेंद्र गावित यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मा. केकटर, जिल्हाधिकारी श्री . कैलाश शिंदे , मा. आमदार श्री. श्रीनिवास वनगा , मा. नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे , माजी आमदार श्री. विलास तरे असिस्टंट सिवील सर्जन डॉ. केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संचालक डॉ. आनंद कापसे, प्राचार्य डॉ. विपीन जैन , संचालक प्रकल्प डॉ. अनुप निगवेकर , संचालक ग्रामिण आरोग्य सेवा डॉ. चंद्रशेखर गोडा इ. पदाधिकारी उपस्थित होते.
ढवळे रूग्णालयामध्ये 50 खाटाचा कोविड कक्ष व 50 खाटांचा नॉन कोवीड रुग्णांसाठी संपूर्ण विलगीकरणासह सेवा देणाऱ्या कक्षाची सुरवात करण्यात आली आहे. कोवीड रग्णांसाठी आयसीयू , कोविड संशवित रुग्णांसाठी 50 डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वेगळी टिम कार्यरत राहणार आहे. डॉ. शंकर नारायण , डॉ. कुणाल दोशो डॉ. माधव देवकाटे (इटॅसिकिस्ट) या अलोपेथीक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांचे उपचार होतील. जोडीने डॉ. प्रशांत तोळी यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथीक उपचार करून रुगणांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी फायदा मिळेल, डॉ. प्रकाश गुयूरकर, इंफेक्शन टोल प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळतील. SRL फडके यांच्या सहकार्याने स्वैब टेस्टींग त्वरीत करून मिळण्याची सुविधा कोविड कक्षामध्ये उपलब्ध आहे.
या प्रसंगी मा. खासदार श्री. राजेंद्र गावित यांनी या रूग्णालयास एक रूग्णवाहीका भेट देण्याचे जाहीर केले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प