सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोळा सणासाठी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना.

जिल्ह्यात पोळा सण मंगळवार (ता. १८) ऑगस्ट रोजी साजरा होणार

Sudarshan MH
  • Aug 17 2020 11:59AM
सुदर्शन  न्युज :नांदेड दि १७  : जिल्ह्यात पोळा सण मंगळवार (ता. १८) ऑगस्ट रोजी साजरा होणार असून हा सण ग्रामपातळीवर व्यापक स्वरुपात साजरा होतो. या सणाचे औचित्य साधून ग्रामपातळीवर कोरोना संसर्गजन्य विषाणुचा प्रसार होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार इंसिडंट कमांडर व सहाय्यक इंसिडंट कमांडर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात खालील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन पोळा सण साजरा होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

पोळा सण हा घरगुती सण म्हणून साजरा करावा. यादिवशी मिरवणुका काढू नयेत. अत्यंत साधेपणाने व मर्यादित व्यक्ती समवेत मास्क, सॅनिटायझर, शारिरीक अंतर आदींचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामसेवक, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांची ग्रामपातळीवर नियुक्ती करुन कोविड-19 कोरेाना प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन होऊन विषाणुंचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. या दिवशी धार्मिक स्थळाच्या‍ ठिकाणी लोकांचा जमा एकत्रित होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्थानिक स्तरावर नियोजन करुन हा सण व्यवस्थितरित्या पार पडेल याची इंसिडंट कमांडर व सहाय्यक इंसिडंट कमांडर यांनी योग्य ती कार्यवाही करावी.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार