सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार:जिल्ह्यासाठी 2 हजार अँन्टीजन किट्स प्राप्त दररोज किमान 300 स्वॅब घेण्याचे निर्देश

नंदुरबार आरोग्य विभाग

Nandurbar MH
  • Aug 11 2020 11:07AM
  सुदर्शन न्युज   नंदुरबार  : कोरोनाची संपर्क साखळी कमी कालावधीत खंडीत करण्यासाठी दररोज किमान 300 स्वॅब घेण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेने करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.जिल्ह्यासाठी 2 हजार अँन्टीजन किट्स प्राप्त झाल्याचीही माहिती देण्यात आली.
कोरोनाबाबत आयोजित ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकरी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके आदी उपस्थित होते.
आरटीपीसीआर लॅबसाठी आवश्यक मंजूरीची प्रक्रीया पूर्ण झाली आहे. किरकोळ तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर स्वॅबची तपासणी करता येईल.
  डॉ.भारुड म्हणाले, नंदुरबार तालुक्यातून 125, शहादा येथून 100 आणि तळोदा व नवापूर येथून 70 स्वॅब घेण्यात यावेत. ज्येष्ठ नागरिक आणि अतिजोखमीच्या व्यक्तिंमध्ये साधारण लक्षणे आढळल्यास त्वरीत स्वॅब घेवून उपचार सुरू करण्यात यावेत. त्यासाठी मोबाईल टीमचा उपयोग करण्यात यावा. शहरी भागासोबत ग्रामीण भागातूनही स्वॅब नमुने घेण्यासाठी नियोजन करावे.
नवापूरात स्वॅब नमुने घेण्यासाठी जनतेच्या सोईची जागा निश्चित करणे, नवापूरला कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत प्राथमिक तयारी करणे, अक्कलकुवा येथे देखील दोन दिवसात केंद्र सुरू करणे, नंदुरबार येथील शासकीय महिला रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी. रुग्णालयासाठी आवश्यक बाबींची पूर्तता तात्काळ करण्यात यावी. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, नवापूर, चिंचपाडा आणि नंदुरबार येथे खाजगी रुग्णालयात कोविड उपचार सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन करणे अशा विविध विषयांवर आढावा घेण्यात आला.
कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नंदुरबार व  शहादा येथील कोविड केअर सेंटरची क्षमता वाढविण्याची गरज असून त्यादृष्टीने तयारी करण्यात  येत आहे, अशी माहिती श्री.गौडा यांनी दिली. स्वॅब तपासणी वाढल्यास मृत्यू दर कमी करता येईल, असेही ते म्हणाले.बैठकीस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी उपस्थित होते. 
दरम्यान, नंदुरबार येथील  साक्री नाका भागातील 55 वर्षीय महिला 7 ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल झाली होती 8 ऑगस्ट रोजी मरण पावली होती. तथापि आज 10 ऑगस्ट रोजी तपासणी अहवाल प्राप्त झाला व ती पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. नंदुरबार जिल्ह्यातील मृतांची संख्या आता एकूण 47 झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित संख्या 859, बरे झालेले 509, उपचार घेत असलेले 254, स्वँबसंख्या 4936,  प्रलंबित तपासणी अहवाल 105, अशी दहा ऑगस्ट अखेरची स्थिती आहे.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार