नंदुरबार: मूर्तीकारांची स्टाँल परवान्यासाठी प्रशासनाकडे धाव
गणपती मूर्ती विक्री स्टॉल चे नियम
सुदर्शन न्युज : नंदुरबार - गणपती मूर्ती विक्री स्टॉलला नियम,अटीच्या आधारे परवानगी द्यावी, यासाठी मूर्ती विक्रेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. नंदनगरी गणेश मूर्तिकार संघटना, गणपती मूर्ती विक्रीधारक संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनालाही देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाची महामारी सुरु असून कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी शासनाने नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या आहेत. तथापि गेल्या सहा महिन्यांपासून लोकांचे चलन-वलन थांबलेले आहे. रोजीरोटीचा विषय एैरणीवर आलेला आहे. गणपती मूर्ती बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक करीत असतात. अशा मूर्तीकार कारागिरांना त्यांनी आजपर्यंत गुंतविलेले पैसे (भांडवल) खुले होण्याची अपेक्षा आहे. विक्रेत्यांना गणपती मूर्ती विक्रीतून संसारासाठी आर्थिक हातभार मिळणार आहे. स्टॉलधारकांना स्टॉल बांधणे व गणपती मूर्ती आणणे यासाठी साधारणतः दोन दिवसाचा कालावधी आणि मूर्ती विक्रीसाठी पाच दिवसाचा कालावधी अशी सात दिवसाची परवानगी मिळावी. सर्व स्टॉलधारक येणार्या ग्राहकांना सॅनिटायझरचा वापर करुन सुरक्षिततेचे सर्व उपाय अवलंबून मूर्तीला हात न लावता मूर्ती विक्री करु आणि शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील. तरी गणपती मूर्ती स्टॉलधारकांना मूर्ती विकण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प