सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुदर्शन न्युज इफेक्ट: उपनगर पोलीस निरिक्षक नंदवाळकर तडकाफडकी हेडक्वॉटर जमा

उपनगर पोलीस निरिक्षक नंदवाळकर तडकाफडकी हेडक्वॉटर जमा

Nandurbar. MH
  • May 6 2021 12:04PM
 
नंदुरबार - येथील उपनगर पोलीस ठाण्यातून पोलिस निरिक्षक नंदवाळकर यांची आणि एका  हवालदार तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. खरे कारण अद्याप गुलदस्त्यात असून डिसपोज करण्यासाठीचा मद्यसाठा परस्पर विक्री प्रकरणात बदली झाल्याची जनमानसात चर्चा आहे. त्याचबरोबर नष्ट करण्याचा मद्यसाठा परस्पर विक्री प्रकरणी गुन्हा दाखल होण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. 
 
सुदर्शन न्यूज ने कालच याविषयी बातमी प्रकाशित केली होती. पकडलेला मद्यसाठा नियमानुसार नष्ट करण्या ऐवजी परस्पर ज्या हॉटेलवाल्याला विकला त्याच हॉटेलवर पोलीसांच्या दुसऱ्या विभागाने अचानक छापा टाकल्यामुळे एका पोलिस अधिकाऱ्याचे बिंग फुटले आणि आता ती "छोटी"सी भुल त्याला महाग पडणार, अशा आशयाचे ते प्राथमिक वृत्त दिले होते. आज सकाळी त्याला पूरक घटना घडताना दिसल्या. उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंद्वाळकर आणि त्यांचे सहकारी उपनिरीक्षक यांची तडकाफडकी नंदुरबार पोलीस मुख्यालयात बदली झाली आहे. याविषयी सूत्रांकडून प्राप्त झालेली माहिती अशी की उपनगर पोलीस ठाणे क्षेत्रात मागील काही दिवसापासून सट्टा जुगार अवैध दारू विक्री आणि तत्सम अवैध धंद्या विषयीच्या तक्रारी वाढलेल्या होत्या. पोलीस निरीक्षक नंद्वाळकर हे बंदोबस्त करण्यात कमी पडत असल्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना निदर्शनास आले होते. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तात्काळ दखल घेऊन ही बदली केल्याचे म्हटले जात आहे. परंतु अशी चर्चा आहे की, उपनगर ठाण्यातील पथकाने काही दिवसांपूर्वी अवैध मद्य साठा पकडला. नियमानुसार तो नंतर नष्ट करायला हवा होता. परंतु तसे केले गेले नाही. दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने एक छोटी हॉटेलवर अचानक छापा टाकला. छापा टाकून तपासणी केली तेव्हा त्यांना तिथे आढळून आलेल्या बॉक्सवर जप्तीनंतर लावले जाणारे लाल लेबल आढले असल्याचे कळले त्यावरूनच पोल खोल झाली आणि मद्यसाठा त्या हॉटेलात विकण्याची पोलिस अधिकाऱ्यांनी केलेली चूक उघडकीस आली, अशी शहरात जोरदार चर्चा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे या घटनेला दुजोरा दिलेला नाही. असे असले तरी पोलीस अधीक्षक पंडीत यांच्याबद्दल जनमानसात आदरपूर्वक भीती आहे. डिपार्टमेंटच्या संभाव्य बदनामीला न घाबरता अधिकाऱ्यांवर केलेल्या कार्यवाही बद्दल जनतेकडून समाधान व्यक्त होत असून कौतुकचा वर्षाव केला जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार