सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुदर्शन महादणका.. मुंबईत रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू; ७ जखमी दुर्घटनेची उच्च न्यायालयानं घेतली दखल..

इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू; ७ जखमी दुर्घटनेची उच्च न्यायालयानं घेतली दखल..

Sudarshan MH
  • Jun 11 2021 3:22PM
 
मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जण मृत्यूमुखी पडले होते. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली असल्याची माहिती मिळाली यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं.ही ईमारत अनधिकृत होती , पोलिसांनी ईमारत मालक रिजवान सिद्दिकी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.सुदर्शन न्यूज ने सातत्यानं ही बातमी लावून धरली होती. आज या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत सुनावणी सुरू केली.
 
काय होती घटना:
मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारत शेजारी असणाऱ्या घरांवर कोसळली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु केलं. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत जखमींना कांदिवलीमधील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “१७ जखमींना आणण्यात आलं होतं. यामधील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. इतर आठ जणांवर उपचार सुरु होते”.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार