सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

१० वी १२वी परक्षेबद्दल राज्यातील विद्यार्थी, पालक शिक्षक संभ्रमात शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनात नापास- भाजप शिक्षक आघाडी

शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनात नापास- भाजप शिक्षक आघाडी

Snehal Joshi
  • Dec 29 2020 7:01PM
राज्यात १० व १२ वीच्या परीक्षांच्या तारखा कधी घोषित होतील , परिक्षा पद्धती  , पेपर पॅटर्न , मूल्यमापन ,   अभ्यासक्रम किती असेल याबाबत वर्ष संपत आले तरीही शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित धोरण ठरविले जात नसून हा संभ्रम दूर करावा अश्या मागणीचे निवेदन भाजपा शिक्षक आघाडीच्या राज्य संयोजक डॉ कल्पना पांडे , डॉ उल्हास फडके व पूर्व विदर्भ संयोजक अनिल महादेवराव शिवणकर  यांनी मा  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,शालेय शिक्षणमंत्री मा वर्षाताई गायकवाड , राज्य शिक्षणमंत्री मा बच्चू कडू व अप्पर सचिव यांना  २८ डिसेंबर ला  पाठविले  आहे. 
 राज्यात १० वी व १२ वीच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.परंतु १० वी व १२ वी ची परिक्षा कधी होणार ? अभ्यासक्रम किती असणार ? पेपर पॅटर्न कोणता असणार ? जुनाच की नविन ? तोंडी व लेखी गुणांचे प्रमाण काय असणार ? अभ्यासक्रम कमी झाल्यामुळेमुल्यमापन, गुणदान किती व कसे असणार ? परिक्षा आॅफलाईन की आॅनलाईन ? गुणदान तक्त्याचे नियोजन कसे असणार? आणखी अभ्यासक्रम कमी करणार आहे की नाही ? परिक्षा बहुपर्यायी प्रश्नावली की जुन्याच पध्दतीची प्रश्नपत्रिका असणार ? त्या अनुषंगाने शिक्षकांचे प्रशिक्षण होणार किंवा नाही? अजुन वेळापत्रक का प्रसिध्द करण्यात आले नाही ?असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात असल्याने संपुर्ण शिक्षण क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून गोंधळाची स्थिती आहे.कोरोनावरअद्यापही पुर्णतः मात करण्यात आलेली नाही, त्यामुळे अजुनही पालकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. 
दरवर्षी दहावीला १७ लाख तर १२ विला १५ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होतात. हे सर्व विद्यार्थी ९ वी पासून नवीन पॅटर्न नुसार अभ्यास करीत आहेत .राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरू असल्यातरी विद्यार्थी कमी उपस्थित आहे तर नागपूर महानगरात 4 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याबाबत  निर्णय झाला असून ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू आहे. ऑनलाईन वर्गाला पण अनेक पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. दहा महिने झाले शाळा बंद आहे . विद्यार्थी बिचारे  घरी आहे. मा  शिक्षण मंत्री व त्यांच्या शिक्षण विभागाने १० वी १२ परीक्षेबाबत कोणते नियोजन केले ? असा प्रश्न महाराष्ट्रतील शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेवर पूर्व विदर्भ संयोजक अनिल महादेवराव शिवणकर यांनी केला आहे .संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा संभ्रम दुर करून १0 वी व १२ वी च्या परिक्षेसंदर्भातील सर्व निकष निश्चित करून स्वयंस्पष्ट दिशा-निर्देश तात्काळ निर्गमित करून राज्यातील ३२ लाखाहून अधिक पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनातील संभ्रम दूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे भाजप शिक्षक आघाडीच्या डॉ कल्पना पांडे , डॉ उल्हास फडके , अनिल शिवणकर 
 जिल्हा संयोजक  प्रदीप बिबटे , मेघशाम झंजाळ , कैलास कुरंजेकर , लिलेश्वर बोरकर , स्वरूप तारगे , अरुण रहांगडाले , गुरुदास कामडी ,मनोहर बारस्कर , अरुण पारधी ,रंजीव श्रीरामवार , सचिन कालबांडे , रजनीकांत बोंदरे , मोहन मोहिते ,  यांनी  केली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार