सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विद्यापीठाच्या चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना; शुल्कासह अर्ज करण्याच्या सल्ला

विद्यार्थ्याने आक्षेप घेतल्यानंतर विद्यापीठाने पत्र काढत गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतिसाठी शुल्क भरुन अर्ज सादर करण्याचा सल्ला

Abhimanyu
  • Aug 11 2022 6:18PM
संभाजी नगर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेतील तांत्रिक गोंधळामुळे बी.ए., बी.कॉम., बी.सी.ए. अशा विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही गुणपत्रिकेवर काही विषयात शून्य गुण दाखवण्यात आले आहेत. याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर विद्यापीठाने पत्र काढत गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतिसाठी शुल्क भरुन अर्ज सादर करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळत असून, विद्यापीठाच्या चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना का असा प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. 

6 ऑगस्ट रोजी मराठवाडा विद्यापीठाच्या बीएय, बीकॉम, बीएससीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र यावेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक विद्यार्थी यांचे ग्रेड शून्य दाखवण्यात आले. काहींना एका विषयात तर काहींना चार-चार विषयात शून्यू ग्रेड दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच विद्यार्थ्यांना त्याच विषयात पहिल्या सत्रात ए ग्रेड मिळाले आहे. या सर्व गोंधळानंतर निकालात बदल होऊ शकतो, पाच-दहा टक्के निकालच असं होऊ शकते असे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणाले. तसेच निकालात सुधरणा करण्याचा पर्याय असल्याचे कुलगुरू म्हणाले. 

या सर्व गोंधळानंतर 10 ऑगस्ट रोजी विद्यापीठाने एक पत्र काढले आहे. ज्यात म्हटले आहे की, बी.एस्सी. प्रथम, द्वितीय, तृतिय वर्ष (सत्र पध्दत) मार्च एप्रिल 2022  च्या जुन-जुलै 2022  मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 6 ऑगस्ट रोजी घोषीत झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रतिसाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी तो दिलेल्या मुदतीत आपल्या महाविद्यालयात अर्ज सादर करावेत. त्यांनतर कोणत्याही परिस्थीतीत अर्ज स्विकारले जाणार नसल्याचं विद्यापीठाने म्हटले आहे. विद्यापीठाने याच पत्रात अर्ज करण्यासाठी शुल्क लागणार असल्याचा उल्लेख केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार