सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

* कारंजा बाजारपेठेत वाढती गर्दी पाहता प्रशासनाच्या वतीने लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी*

प्रशासनाच्या वतीने लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी

Vashim MH
  • Apr 18 2021 5:21PM
 
 
कोरोनाचा वाढता प्रादुभाव लक्षात घेउन कारंजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब दादाराव डोलारकर व कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतिश पाटील यांनी कारंजा शहरात 
 रस्त्यावर फिरणाऱ्या इसमास व लघु व्यवसाय करणार्‍याना आपला व्यवसाय कुठे व कसा करायचा त्याबाबत समजाउन सांगीतले व एकाच ठिकाणी गर्दी करण्यास सक्त मनाई केली यामुळे रस्तावरील गर्दी कमी झाली , आज दिनांक 17 एप्रिल 2021 शनिवार रोजी दुपारी बारा वाजता च्या दरम्यान कारंजा पोलिस स्टेशन व नगर परिषद प्रशासनाच्यावतीने या लॉक डाऊन ची कडक अमल बजावणी करता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या इसमावर व रस्त्याच्या कडेला लावणारे हातगाडीवर लघु व्यावसायिकाना आपले व्यवसाय लावण्यास.सक्त मनाई करताना असेच चित्रपाहायला मिळत आहे कारंजा शहरात नेहमी शेकडो शहरी व ग्रामीण भागातील प्रवासी व व्यावसायिक आपला उदरनिर्वाह करिता कारंज्या मुख्य बाजारपेठेत दररोज प्रत्येक चौकात चौकात रस्त्याच्या बाजूस हात गाड्या लावून लघु व्यवसाय करतात आपले दुकान रस्त्यावर लावल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या पादचारी व प्रवासी वाहनांना अडथळा निर्माण होऊन तसेच या दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी होते पाहता-पाहता तोबा गर्दी होत असते यामुळे वाशिम जिल्हासह ,कारंजा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून या गर्दीला आळा बसण्याकरिता कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सतीश पाटील व नगर परिषद चे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्या टीमसह व इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत लघुव्यवसायीकांना अखेरची सुचना देण्यात आली की आपला व्यवसाय संमिश्र वस्तीतील गल्लीबोळ्यात जाऊन फिरून करावा अन्यथा रस्त्यावर लघु व्यवसाय करून गर्दीला व ट्रॅफिकला अडथळा निर्माण झाल्यास तसेच विनाकारण फिरणाऱ्या मनुष्य व जो कुणी तोंडाला मास न घालता फिरत असेलअशा इसमावर सक्त कारवाई करण्यात येईल तसेच लघु व्यवसायीक यांनी रस्त्यावर आपला व्यवसाय करण्यास सक्त मनाई आहे असे आदेश देण्यात आल्या असून लघु व्यवसायिकांनी आपले हात गाड्या घेऊन जाण्यास सांगीतले त्यावरुन छोटे व्यवसायीक निघुन जातानादिसून येत आहे असे चित्र सध्या कारंजा शहरात पाहायला मिळत असून प्रशासनाच्या लॉक डाऊनया काळात अंमलबजावणीने लघु व्यवसायकांनी प्रसाशनाला मदत केली असली तरी मात्र कारंजातील मुख्य रस्ते ओसाड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार