सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा

हिंदु जनजागृती समितीचे पोलीस अधीक्षक,जिल्हाधिकारी यांना निवेदन*

Sudarshan MH
  • Dec 30 2020 6:44PM

 

यवतमाळ- *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*

नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री धूम्रपान,मद्यपान, अंमली पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते, तसेच या दिवशी मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात. गंभीर बाब म्हणजे या दिवशी मद्यपान प्रारंभ करण्यामध्ये युवा पिढीचे प्रमाण जास्त असून त्यामध्ये अल्पवयीन मुले, महिलांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजात फटाके उडवून प्रदूषण करणे ,कर्णकर्कश ध्वनिवर्धक लावणे,अश्लील अंगविक्षेप करून नाचणे,शिवीगाळ करणे मुलींचे छेड,विनयभंग, बलात्कार आदी कुकृत्ये होतात, याचा एकूणच ताण पोलीस प्रशासनावर येतो. कायदा-सुव्यवस्था यांच्या दृष्टीने ही गंभीर बाब निर्माण होत आहे. यावर्षी कोरोणा महामारीने सर्वत्र कहर केला आहे, अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहेत,त्यामुळे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने ३१ डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी मद्यपान,धूम्रपान तसेच पार्ट्या करणे यावर प्रतिबंध घालण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना २९ डिसेंम्बरला ऑनलाईन पाठवण्यात आले. वरील अपप्रकार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात कोरोनाच्या दृष्टीने ऑनलाईन प्रवचन, वॉट्सअप्प, फेसबुक, ट्विटर आदी सामाजिक माध्यमाद्वारे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच भारतीय संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी नववर्ष हे ३१डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करावे,असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार