सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यातील आघाडी सरकार शेतकरी हितविरोधी प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे

शेतकर्‍यांना केंद्र बिंदू मानून केंद्रातील नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकरी सन्मान योजनेसह शेतकर्‍यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून दिलासा देण्याचे आणि आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र राज्यातील आघाडी सरकारने शेतकर्‍यांना कसलीच मदत केली नाही उलट पीक विम्याचे निकष बदलून विमा कंपन्यांना मालामाल केले. खर्‍या अर्थाने राज्यातील ठाकरे सरकार शेतकरी हिताविरोधी आहे असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी लातूर येथे बोलताना केले

s.ranjankar
  • Jul 11 2021 12:09PM

लातूर : शेतकर्‍यांना केंद्र बिंदू मानून केंद्रातील नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकरी सन्मान योजनेसह शेतकर्‍यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून दिलासा देण्याचे आणि आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र राज्यातील आघाडी सरकारने शेतकर्‍यांना कसलीच मदत केली नाही उलट पीक विम्याचे निकष बदलून विमा कंपन्यांना मालामाल केले. खर्‍या अर्थाने राज्यातील ठाकरे सरकार शेतकरी हिताविरोधी आहे असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी लातूर येथे बोलताना केले. भाजपा किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियान सुरु करण्यात आले असून या निमित्ताने गुरुवारी लातूर येथील प्रणवश्री मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वासुदेव काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड हे होते तर याप्रसंगी आ. अभिमन्यू पवार, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, सुधाकर भोयर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, त्र्यंबक गुट्टे, रामचंद्र तिरुके, अशोक केंद्रे, सौ. शामल कारामुंगे, शिवाजी केंद्रे, प्रा. विजय क्षिरसागर, जिप सभापती रोहिदास वाघमारे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती रेखाताई तरडे, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश्वर चेवले, अमोल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सुचनेनूसार या कार्यक्रमात भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीसपदी दिलीपराव देशमुख, प्रदेश चिटणीस अनिल केंद्रे, भाजपा लातूर जिल्हा सरचिटणीसपदी किरण उटगे, जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता, मच्छिमार सेल जिल्हा संयोजक ब्रम्हदेव सोनेवाड, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बळवंत पाटील आणि महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सोनाली गुळभिले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते सत्कार करुन नियुक्तीपत्र देण्यात आले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षण प्रश्नावरुन आक्रमक भूमिका मांडल्या बद्दल सत्ताधारी पक्षाने निलंबित केलेल्या आ. अभिमन्यू पवार यांचा लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने सत्कार करुन गौरव करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आजपर्यंतचा सात वर्षाचा कार्यकाळ शेतकर्‍यांसाठी समर्पित आहे. त्यांनी नवे कृषी धोरण जाहीर करुन शेतकर्‍यांना मोठा आधार दिला. शेतकर्‍यांसाठी आणि शेतीसाठी कोट्यावधी रुपयांची अर्थसंकल्पात नुसती तरतुदच केली नाही तर अनेक योजना प्रत्यक्ष कार्यान्वीत केल्या, जमिनीची पत तपासणी पासून पीक विम्यापर्यंत विविध योजना राबविल्या असल्याचे सांगून वासुदेव काळे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अ‍डचणीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना कसल्याच प्रकारची मदत केली नाही हे सरकार शेतकरी हिताविरोधी आहे. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या या सरकारवर शेतकरी, शेतमजुरासह सर्व सामान्य जनता नाराज आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले हे सरकार सत्तेवर राहिले तर ओबीसीचे शैक्षणीक आणि नोकरीचे आरक्षण सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही अशी भिती व्यक्त करुन हे महाविकास आघाडी सरकार मराठा, ओबीसी समाजाला आरक्षण देवू शकत नाही असे बोलून दाखविले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने न्याय देण्याची भूमिका घेतली. मागील काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील सरकारने शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम केले असे सांगून यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्व सामान्यांची पिळवणूक करत स्वत:च्या कुटूंबाचे आणि बगल बच्च्यांचे हित साधले. सहकारातील अनेक कारखाने बंद पाडून कवडीमोल किमतीने बगल बच्च्यांना दिले. केंद्र शासनाच्या नविन सहकार मंत्रालयाची जबाबदारी आता अमितजी शहा यांच्याकडे आल्याने येत्या काळात सहकार क्षेत्रात केलेल्या पापाचा हिशोब चुकता झाल्याशिवाय राहणार नाही असे बोलून दाखविले. मराठा आरक्षणाचे पाप झाकण्यासाठी ओबीसीचे आरक्षण घालविले याबाबत विधिमंडळाच्या सभागृहात आवाज उठवणार्‍या भाजपाच्या आमदारांना जाणीवपूर्वक निलंबित करण्याचा प्रकार ठाकरे सरकार कडून झाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजपा लढा सुरुच राहणार असल्याचे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, लातूर जिल्हा भाजपा पक्ष संघटनेच्या बाबतीत राज्यात क्रमांक एकचा असून येत्या काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सर्वांना सोबत घेवून सर्वच निवडणूकीत भाजपाला यशस्वी करुन लातूर जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करण्याचे अवाहन केले. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यात भाजपा मजबूत होत आहे. सर्वांना सोबत घेवून प्रवाहात आणण्याचे काम ते करीत आहेत असे सांगून यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार म्हणाले की, आरक्षण प्रश्नाबाबत आवाज उठविला म्हणून विधानसभेत आमच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली. गोंधळतर सर्वच पक्षाचे आमदार करत होते मात्र सरकारला अडचणीत आणणार्‍या भाजपाच्या आमदारावर शोधून निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. आमचा जितका आवाज दाबतील तितका मोठा होईल सरकारची ही मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही असे बोलून दाखविले. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, सुधाकर भोयर, नुतन सरचिटणीस दिलीपराव देशमुख जिल्हा परिषदेचे राहुल केंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन केंद्र शासनाच्या शेतकरी हिताची माहिती दिली. या शेतकरी संवाद अभियानास जिल्हाभरातील किसान मोर्चासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.    


 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार