आज आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पॅन इंडिया कायदेविषयक जनजागृती
नंदुरबार च्या वतीने एस. ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्य लय नंदुबार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आज आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पॅन इंडिया कायदेविषयक जनजागृती व पोहच या मोहिमेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार च्या वतीने एस. ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्य लय नंदुबार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमादरम्यान बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर फलके दाखवुन प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच स्त्रीयाचे शोषण, स्त्रीभ्रूण हत्या व स्त्रीयांचे शिक्षण या मुद्यावर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. सदर कार्यक्रमात मुलीचे महत्व विषद करणारे नृत्य सादर करण्यात आले व स्त्री भ्रूण हत्या या विषयावर पथनाटय करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना बक्षिसे व गणवेश वितरीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. डि. व्ही. हरणे, डॉ तेजल चौधरी, अध्यक्ष, लॉयन्स क्लब नंदुरबार, एस. ए. मिशन, हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सी., नुतनवर्षाताई राजेश वळवी यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात श्री. आर. बी. पाटील सहाययक शिक्षण उपनिरीक्षक विभाग, श्री. भावे सोनवणे, नगरपालिका, शिक्षण प्रशासकीय अधिकारी श्री. जितेंद्र तुळे, अध्य क्ष, युवारंग फाउंडेशन, नंदुरबार व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करतांना श्री. डि. व्ही. हरणे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार यांना असे सांगितले की, सृष्टीचे अस्तित्व टिकविण्यासाठी स्त्रीयाचे अस्तित्व आवश्यक आहे. मुली या मुलापेक्षा प्रत्येक क्षेत्रात पुढे असुन त्याच्या विकासासाठी व सुरक्षिततेसाठी कुटुंबियांनी व समाजाने हातभार लावला पाहिजे. मुलींना विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. डॉ. तेजल चौधरी यांनी त्यांचे मार्गदर्शनास असे सांगितले की, मुलींनी शिक्षण शिकुन आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे व कुटुंबास हातभार लावला पाहिजे. कुमारी कल्याणी बडगुजर या विद्यार्थीनीने सुध्दा आंतरराष्ट्रीय बालिका दिवस या विषयावर मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनास व यशस्वीतेसाठी एस.ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार च्या प्राचार्या नुतनवर्षाताई राजेश वळवी व इतर शिक्षकांनी हातभार लावला. सदर कार्यक्रम आयोजित करण्यासंबंधी श्री. आर. एस. तिवारी, जिल्हा व सत्र न्यायाधीश, सो.., नंदुरबार यांचे मार्गदर्शन लाभले.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प