सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठीच निर्यात साठ्यातले रेमडिसिवर विकले, कोणत्याही चौकशीला आम्ही तयार; शिरिष चौधरी यांचे मंत्री मलिकांना सडेतोड ऊत्तर*

शिरिष चौधरी यांचे मंत्री मलिकांना सडेतोड ऊत्तर*

Nandurbar. MH
  • Apr 21 2021 6:33AM
नंदुरबार- आमच्या स्वखर्चाने कंपनीकडून अधिकृतपणे खरेदी करून मगच रेमडिसिवर इंजेक्शनची आम्ही बाहेर विक्री केली. मंत्री नबाब मलिक म्हणतील त्या चौकशीला सामोरे जायला आणि ते म्हणतील तशी तपासणी होऊ देण्याला आम्ही केव्हाही तयार आहोत. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वेळ पडल्यास असा गुन्हा आम्ही वारंवार करू, अशा शब्दात भाजपाचे माजी सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नबाब मलिक यांना सडेतोड शब्दात प्रतिउत्तर दिले.
नंदुरबार येथील हिरा प्रतिष्ठानने रेमडिसिवरचा साठा दडवून ठेवला असून मोठा काळाबाजार त्या माध्यमातून केला जात आहे, अशा अर्थाचे वक्तव्य राज्याचे मंत्री नबाब मलिक यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले होते. त्या संदर्भात माजी आमदार शिरिष चौधरी यांनी आज मंगळवार रोजी सायंकाळी नंदुरबार येथे पत्रकार परिषद घेतली व हे आरोप अवास्तव असल्याचे सांगत खंडन केले. शिरिष चौधरी या प्रसंगी म्हणाले, सर्व कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता ठेवून व रुग्णांच्या यथोचित नोंदी ठेऊनच प्रत्येक गरजू रुग्णांपर्यंत आम्ही इंजेक्शन पोहचवले आहेत. शिरिष चौधरी यांनी पुढे सांगितले, वस्तुस्थिती अशी आहे की, औषध निर्यात करणारी ही जी कंपनी आहे, त्यात मी आणि माझे बंधू उद्योजक डॉ.रविंद्र चौधरी सहयोगी आहोत. आमचे संबंध असल्याने या कंपनीकडून इंजेक्शन्स उपलब्ध करून घेणे आम्हाला सहज शक्य झाले. रेमडेसिवरचा बाहेर देशात निर्यात करण्यासाठीचा साठा या कंपनीकडे होता. तो साठा विदेशात पाठवायचा होता. परंतु ईकडे दीड महिन्यापासून कोंडी चालू होती. गावा-गावातील रुग्णांचे प्राण इंजेक्शन अभावी टांगणीला लागलेले होते. ती वाईट स्थिती लक्षात घेऊनच रडणार्‍या लोकांच्या मदतीला आम्ही धावलो आणि कंपनीच्या हाती असलेला तो साठा आमच्या हिरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अधिकृत विकण्यासाठी वापरला. हिरा प्रतिष्ठानने जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या सर्व जिल्ह्यांसह जवळपास ७ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून दिले. ईतक्या लोकांचे प्राण या प्रकारे वाचवले नसते तर राज्यात मोठा उद्रेक झालेला पहायला मिळाला असता.आमचे त्यांना आव्हान आहे की, भलेही श्रेय त्यांनी घ्यावे परंतु आम्हाला तो निर्यातसाठा वितरीत करण्याची अधिकृत परवानगी सरकारकडून त्यांनी मिळवून द्यावी. आम्ही तासाभरात किमान एक लाख इंजेक्शन्स उपलब्ध करून देऊ. त्यांनी आरोप करण्याऐवजी एवढे काम केले तरी कित्येक जणांचे प्राण वाचू शकतील, असे स्पष्टकरून शिरीष चौधरी म्हणाले की, कोणताही नफा न कमवता प्रसंगी तोटा सहन करून केवळ मानवता दृष्टीकोनातून रुग्णांच्या मदतीला धावण्याचे कार्य आम्ही केले. परंतु ज्यांच्या पोटात दुखले ते हितशत्रू विपरित माहिती प्रसारित करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार