जातीवाचक शिवीगाळ करत एकास जीवे मारण्याची धमकी
सिरसाळा पोलीस ठाण्यातसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
परळी :- सिरसाळा येथे औरंगपूर येथील एकास जातीवाचक शिवीगाळ करत गंभीर दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 7 आरोपी विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माजलगाव पोलीस उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक स्वप्निल राठोड हे करीत आहेत.
मी आशोक उद्धव घडवे (वय 25 वर्षे) धंदा- शेती रा. औरंगपुर ता. परळी जि. बीड यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 20/09/2022 रोजी सकाळी 12.00 वाजण्याचे सुमारास माझी मोटारसायकल क्रं.MH44 M 9331 वर बसुन मी व माझा मित्र इरफान सय्यद असे सिरसाळा येथून साडी बदलुन आणण्याकरीता परळी कडे जात असताना अनुसया मंगलकार्यालया जवळ जगदंब गॅरेज वर मोटारसायकलची ऑइलींग करत असताना आरोपी 1 ) अविनाश राजेभाऊ मेंढके 2 ) दिनेश अनंत जाधव (3) बालाजी मेंढके 4)अर्जुन जाधव 5) विजय गायकवाड 6) रुपेश गायकवाड 7) राहुल गायकवाड सर्व रा. सिरसाळा ता. परळी हे मोटार सायकलवर गॅरेजवर आले व मला म्हणाले कि, तु लय मोठा नेता झालास काय तु नेतेगीरी कशाला करतो या कारणा वरुन तु माजलास काय असे म्हणत जातीवाचक शिविगाळ केली. यावेळी फिर्यादी अशोक घडवे यांनी आरोपीना
विनाकारण जातीवाचक शिविगाळ का करता असे म्हणताच अविनाश राजेभाऊ मेंढके याने लोखंडी कत्तिने उलटया बाजुने पाटीवर मारुन जखमी केले व दिनेश अनंत जाधव याने तेथे असलेल्या लोखंडी खुर्चिने डावे हाताचे दंडावर कोपरावर मारुन जखम केली. बालाजी मेंढके अर्जुन जाधव, विजय गायकवाड रुपेश गायकवाड यांनी लोखंडी गज, चाकुने बेल्टने मारहाण केली व जातीवाचक शिविगाळ केली व गळ्यातील सोण्याचे आठ ग्रामचे लॉकेट अविनाश मॅढके याने काडुन घेतले. खिशातील 2500/- रु यांच्या पैकी कोनीतरी काडुन घेतले व तु लय मोठा नेता झालास काय तुला मारुन टाकुल अश्या धमक्या दिल्या. यावेळी भांडणाची सोडवा सोडव ईरफान बिबन सय्यद , बाळासाहेब लक्ष्मण किरवले, माधव भिमराव किरवले रा. सिरसाळा यानी केली.
याप्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात अशोक उद्धव गढवे यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 0194/22 कलम143,147,148,149,327,324,506भादवी प्रमाणेॲट्रॉसिटी ॲक्टनुसार आरोपी अविनाश राजेभाऊ मेंडके, दिनेश अनंत जाधव ,बालाजी मेंढके , अर्जुन जाधव , विजय गायकवाड , रुपेश गायकवाड ,राहुल गायकवाड सर्व रा. सिरसाळा ता. परळी यांचे विरुद्ध दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील आरोपी फरार असून या प्रकरणाचा पुढील तपास माजलगाव उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक स्वप्निल राठोड हे करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प