सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राजकीय स्वातंत्र्य की सांस्कृतिक पारतंत्र्य !

भारतातील कच्चामाल इंग्लंडला पाठवून भारतात पक्क्या मालाची बाजारपेठ निर्माण केली आणि त्यांना अनेक सवलती दिल्या परंतु येथील स्थानिक व्यवसायाला बंद पाडण्याकरिता त्यांच्यावर अनेक कर लादून येथील व्यवसाय डबघाईस आणले.सोबतच स्थानिकांना परावलंबी बनविले. भारतीय समाज हा जगातील अत्यंत परिवर्तनशील समाज समजल्या जातो परकीय लोकांचे आचार-विचार, खानपान,वेशभूषा यांचा भारतीय समाजाने स्वीकार केला. परंतु कालांतराने यामुळे समाजाची आपल्या धर्म व संस्कृती वरील निष्ठा ही कमी होत गेली.

श्रीराम पत्रे धामणगाव रेल्वे ९४२३४२५५७०
  • Jul 2 2020 12:07PM
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात पुरातन व सनातन संस्कृती समजल्या जाते. युनानी सम्राट सिकंदर ते इंग्रजा पर्यंत सतत अडीच हजार वर्षापासून ही संस्कृती परकीय आक्रमकांशी लढा देत आहे. या असंख्य आघाता मुळे भारतीय संस्कृतीला बरेच तडे पडल्याने ती खिळखिळी झालेली आपल्याला दिसून येईल. शक,हुण, कुशान सारखे परकीय आक्रमक आले परंतु त्यांनी येथील संस्कृतीत स्वतःला विलीन करून घेतले. सातव्या शतकापासून इस्लामी आक्रमकांनी येथील संस्कृतीचा जो विध्वंस केला त्याला तोड नाही.परंतु एवढ्या बिकट परिस्थितीतही भारतीय शासकांनी आपल्या अतुल्य पराक्रमाने जगातील इतर संस्कृती चा झाला त्या प्रमाणे भारतीय संस्कृतीचा विनाश होऊ दिला नाही. पण जितका परकीय आक्रमकांच्या शौर्याचा इतिहास आम्हाला शिकविला जातो त्या प्रमाणात स्वकिय शासकांना न्याय दिला जात नाही, हिच या देशाच्या इतिहास लेखनाची शोकांतिका म्हणावी लागेल. जो पर्यंत मुस्लिम आक्रमक भारतावर लुटीच्या उद्देशाने स्वार्‍या करीत असे तोपर्यंत त्यांनी आर्थिक व मानवी विध्वंसक जास्त केला परंतु जेंव्हा ते सत्ताधारी म्हणून येथे स्थाइक झालेत तेंव्हा येथील धर्मावर प्रहार करून त्यांनी इस्लाम धर्म वाढविण्यास सुरुवात केली पण यात त्यांना पाहिजे तसे यश न मिळाल्याचे कारण येथील कर्मठ धर्मनिष्ठा त्यांच्या धर्म परिवर्तनाच्या आड आली व त्यांना देशातील कित्येक प्रांतात सशस्त्र विरोध सुरू झाला. यामुळे मुगल शासकांनी स्थानिक समाजाशी नमते घेऊन आपली सत्ता स्थिर केली.परंतु औरंगजेबाच्या धर्मांधते मुळे छत्रपती शिवाजी, राजा छत्रसाल, गुरुगोविंद सिंग सारख्या योद्ध्यांनी मुघलांना एवढे जेरीस आणले की की भारतात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा सुरू झाली. ज्या मराठ्यांचा विनाश करण्याकरिता औरंगजेब 27 वर्षापर्यंत महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता त्याच मुघल साम्राज्याला अवघ्या पन्नास वर्षात मराठ्यां समोर नतमस्तक व्हावे लागले. परंतु दुर्दैवाने शिवाजी महाराज सारखी राष्ट्रीय दूरदृष्टी येथील राज्यकर्त्यांमध्ये नसल्याने लवकरच देश इंग्रजांच्या अधिपत्या खाली गेला. प्रश्न हा पडतो की भारतीय राज्यकर्ते परकीयांसमोर कमकुवत का ठरले? कारण त्यावेळच्या राज्यकर्त्यां सोबतच भारतीय समाजही आपल्या राष्ट्रीय भावनेने पासून अलिप्त झाला होता. आपले लहानसे राज्य हेच त्यांच्यासाठी राष्ट्र झाले होते,त्यामुळे राष्ट्रीय एकजुटीच्या अभावामुळे संघटित आक्रमकांच्या समोर ते पराभूत झालेत. या देशात असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक एकजूटीला ते राजकीय एकजूटीत परिवर्तित करू शकले नाही.याला फक्त शिवाजी महाराज अपवाद ठरले.परंतु अवघ्या दिडशे वर्षांतच महाराजांच्या राष्ट्रवादाला ही ग्रहण लागले. इंग्रज व पेशवे यांच्यात झालेल्या शेवटच्या युद्धात जेव्हा पेशव्यांचा पराभव झाला व पुण्यात इंग्रजांची सत्ता कायम झाली तेंव्हा पराभुत झालेल्या पेशव्यांच्या सैनिकांनी अवघ्या तीन दिवसात इंग्रजां समोर शरणागति पत्करली व इंग्रजांच्या सेवेत रुजू झाले, इतकी आमची राष्ट्रीय भावना कमकुवत झाली होती. इंग्रजां अगोदर भारतात बाराव्या शतकापासून इस्लामी सत्तेची राजवट होती परंतु त्यांच्या काळात भारतीय प्रथा, परंपरा व शिक्षण व्यवस्थेला कोणताही धक्का बसलेला नव्हता. मुस्लिम शासक येथेच स्थायिक झाल्याने येथील आर्थिक संपदा ही बाहेर गेली नाही. परंतु इंग्रजांनी येथे सत्ता स्थापित केल्याबरोबर येथील संपदा इंग्लंड ला पाठविण्यास सुरुवात झाली. आपले राज्यशकट चालविण्याकरिता येथील उच्चवर्णीयांना पाश्चिमात्य शिक्षण देण्यास इंग्रजांनी सुरुवात केली, त्याकरिता येथील गुरुकुल या भारतीय शिक्षण व्यवस्थेवर विविध अटी लादून त्यांना गुरुकुल बंद करण्यास भाग पाडले. यामुळे भारतीय मुलांवर घडणारे संस्कार व संस्कृत भाषा मागे पडली व पाश्चिमात्य शिक्षण व भाषेचे प्रभुत्व वाढले. इंग्रजांनी भारतीय इतिहास आपल्या सोयीप्रमाणे लिहून भारत हा स्थानिकांचा देश नसून आक्रमक आर्या पासूनच परकीयांचा देश आहे असा इतिहास लिहिला. याचा अभ्यास शाळेत मुलांना देऊन भारतीयांची कोणतीही गौरव गाथा नसुन तो कायम पराजित समाज आहे, अशी न्यूनगंडाची भावना निर्माण केली. इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले च्या म्हणण्यानुसार या देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य येथील संस्कृती व शिक्षण व्यवस्था आहे. एकदा भारतीयांना संस्कारीत करणारी गुरुकुल व्यवस्था बंद पडल्यास आणि इंग्रजी शिक्षण व्यवस्था सुरू झाल्यास येथील नवीन पिढी इंग्रजी संस्कारातून निर्माण होईल जी आपल्याला राज्य चालविण्याकरिता प्रशिक्षित गुलाम म्हणून उपयोगी पडेल. कालांतराने याच स्थानिक सुशिक्षितांनी इंग्रजांनी लिहिलेल्या इतिहासाचा उदोउदो करण्यात स्वतःला धन्य मानले. याच सोबत इंग्रजांनी येथील व्यवसायावर कुठाराघात करण्यास सुरुवात केली. येथील कच्चामाल इंग्लंडला पाठवून भारतात पक्क्या मालाची बाजारपेठ निर्माण केली आणि त्यांना अनेक सवलती दिल्या परंतु येथील स्थानिक व्यवसायाला बंद पाडण्याकरिता त्यांच्यावर अनेक कर लादून येथील व्यवसाय डबघाईस आणले.सोबतच स्थानिकांना परावलंबी बनविले. भारतीय समाज हा जगातील अत्यंत परिवर्तनशील समाज समजल्या जातो परकीय लोकांचे आचार-विचार, खानपान,वेशभूषा यांचा भारतीय समाजाने स्वीकार केला. परंतु कालांतराने यामुळे समाजाची आपल्या धर्म व संस्कृती वरील निष्ठा ही कमी होत गेली.हजार वर्षाच्या राजकीय गुलामी ने आमचे जेवढे नुकसान केले नाही त्यापेक्षा जास्त नुकसान पाश्चिमात्य संस्कृतीची गुलामगिरी स्वीकारल्याने झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मागील सत्तर वर्षात आमच्या सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकीची अवस्था गुलामगिरीची झालेली आहे.इंग्रज तर देश सोडून निघून गेले परंतु त्यांची शिक्षण व्यवस्था,वेशभूषा, खानपान, भारतीय संविधानात त्यांनीच बनवून ठेवलेल्या कायद्यांचे प्रभुत्व, न्यायव्यवस्थेवर ही त्यांनीच स्थापित केलेल्या कायद्यांचा प्रभाव, इतकेच काय स्वातंत्र्य संग्रामाला सदोदित ऊर्जा देणारे ' वंदे मातरम ' गीताच्या ठिकाणी जॉर्ज पंचम च्या भारत आगमना वेळी गायलेल्या स्तुती गीताला राष्ट्रगीत बनवून आजही आम्ही भारताच्या स्वाधीनतेचे गोडवे गातो की पराधीनतेचे ?हे ही एक न सुटणारे कोडेच आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे व तीच आमच्या मुलांचा भौतिक विकास करू शकते. म्हणून आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण देण्यास आई-वडिलांची चढाओढ सुरू आहे.परंतु जगातील 200 देशांपैकी फक्त 12 देशात इंग्रजीचा वापर होतो.इतर देशांनी आपल्या स्थानिक भाषेचा वापर करूनच अनेक वैज्ञानिक शोध लावलेले आहेत. शेवटी एवढेच म्हणायचे आहे की मानवी जीवनात बाह्य शत्रू व अंतर्गत शत्रू असतात. बाहेरील शत्रू शरीराला दुर्बल करतात तर अंतर्गत शत्रू मनाला दूर्बल करतात. हीच परिस्थिती मानव समूहाची किंवा राष्ट्राची होत असते. भारतावर अनेक बाह्य शत्रूंनी हल्ला करून त्यावर सत्ता प्रस्तापित केली. परंतु देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळूनही देशाच्या संस्कृतीवर जर परकियांचा प्रभाव कायम असेल तर ते राष्ट्र पूर्णपणे स्वतंत्र झाले असे समजणे चुकीचे होईल. सद्यपरिस्थितीत ज्याप्रमाणे चीन हा आपला बाह्य शत्रू आहे तसाच तो आपल्या देशाची आर्थिक नाडी आपल्या मुठीत ठेवण्यास टपून बसलेला अंतर्गत शत्रूही आहे.या करिता जोपर्यंत त्याला दोन्ही मोर्चावर निष्प्रभ केल्या जाणार नाही तोवर हा देश स्वयंपूर्ण व सुरक्षित झाला असे म्हणता येणार नाही. तीच परिस्थिती सांस्कृतिक आत्मनिर्भरते बाबत आहे. आज राष्ट्र राजकीय दृष्ट्या स्वतंत्र असला तरी तो पाश्चिमात्य संस्कृतीच्या वेढ्यातून मुक्त झालेला नसल्याने आपला देश पूर्णतः स्वतंत्र झाला असे म्हणता येणार नाही. जोपर्यंत आम्ही आमच्या संस्कृतीचे संगोपन करीत नाही तोपर्यंत आम्ही जापानी लोकांसारखे राष्ट्रवादी बनुन राष्ट्राकरिता संपूर्ण समर्पण करण्यास तयार होणार नाही.            

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार