सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

आयर्न लेडी

प्रियदर्शनी इंदिराजींची संघर्षवृत्ती अंगी भिनविणं हीच त्यांच्या स्मृतिदिनी खरी आदरांजली ठरेल. गळ्यात रुद्राक्षमाळा असलेली ही व्यक्ती अफाट कर्तृत्व घेऊन या जगात वावरली. इंदिरा गांधी..!

- रमेश कुलकर्णी ९९२२९०१२६२
  • Oct 31 2020 1:27PM
काळाची चाहूल मनाला लागत असावी का? मोठा गूढ आणि रहस्य असलेला खोल प्रश्न. पण आध्यत्मिक ओढ असलेली व्यक्ती तिथंवर विचार करत असावी. गळ्यात रुद्राक्षमाळा असलेली ही व्यक्ती अफाट कर्तृत्व घेऊन या जगात वावरली. इंदिरा गांधी..! एक आभाळस्वरूपी नाव. आभाळाला क्षितीजाच्या पल्याड वाकवणारी. त्यांनी हजारो सभा संबोधित केल्या असतील. लक्षवेधी लोकांशी त्या बोलल्या असतील. कोट्यावधी जनतेला त्यांची ओळख असेल... डोळ्यांत त्याच सामावल्या असतील. भुवनेश्वरच्या सभेत त्या बोलल्या आणि तेच शेवटचे ठरले. नियती आणि समज यांचे नाते असेच असेल कदाचित. ‘‘मेरे जिस्म के खून का आखरी कतरा देश की अखंडता और एकता के लिये काम आयेगा,’’ अशी गर्जना ओडिशाच्या सभेत करणाºया इंदिराजींना निकटच्या काळाची चाहूल लागली असावी का? इंदिराजींच्या हत्येची बातमी आली, तेव्हा आपण नेमकं कुठं होतो आणि काय करीत होतो? याचं मिनिटागणिक स्मरण असलेली पिढी अजून हयात आहे. तो काळा दिवस अजूनही चलचित्रासारखा डोळ्यासमोर उभा राहतो. इंदिराजी इतक्या एकरूप झालेल्या लोकनेत्या होत्या. आपल्या घरातील ‘माय’ गेल्याची भावना प्रत्येक घरात होती. प्रत्येक गावात, घरात, मनात सुतकी वातावरण होतं. जग, राष्ट्र, शहर, गाव, खेडे सर्व सुन्न होते. आपल्या लाडक्या ‘इंद्रा गांधी’साठी धाय मोकलून रडणारे, मुंडण करून आदरांजली अर्पण करणारे जागोजागी दृष्टिक्षेपास यायचे. दिवाळीसारखा सण असून चूल न पेटलेली अनेक स्वयंपाकघरं होती. इंदिराजी व सामान्य जनता हे नातंच अनोखं वा खूप कौटुंबिक होतं. ३१ आॅक्टोबर १९८४ हाच तो काळा दिवस. बीबीसीच्या डॉक्युमेंटरीसाठी पीटर उस्तोनावा नावाच्या ‘अँकर’ला सकाळी ९.२० ची वेळ दिली होती. प्रधानमंत्री इंदिराजी आपल्या निवासस्थानामधून कार्यालयाकडे पायीच निघाल्या होत्या. समोर इंदिराजी.. मागे छत्री घेऊन चालत असलेला सुरक्षा रक्षक आणि त्याच्यामागे खासगी सचिव आर. के. धवन. काही कळायच्या आतच... बेअंत सिंह नावाच्या अत्यंत विश्वासू अंगरक्षकाच्या ‘नमस्ते’ अभिवादानंतर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या सुटतात आणि ‘ये क्या कर रहे हो’ या वाक्यासोबत हा लोकनेता रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळतो. बाजूलाच उभा असलेला दुसरा रक्षक सतवंत सिंह निपचित झालेल्या इंदिराजींवर भ्याडपणे गोळ्यांचा वर्षाव करतो. तेथील अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर नेमका त्याचवेळेस चहा प्यायला बाहेर गेलेला असतो. त्यामुळे खासगी गाडीतूनच सोनियाजी व धवन हे ‘एम्स’कडे धाव घेतात. बारा डॉक्टरांची टीम शर्थीचे प्रयत्न करते. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झालेला होता. त्यात इंदिराजींचा ‘ओ’ निगेटिव्ह हा दुर्मिळ रक्तगट. तो देण्यासाठी ‘एम्स’बाहेर रक्तदात्यांची तुफान गर्दी होते. एकूण ८८ बॉटल रक्त इंदिराजींना दिल्या जाऊनही त्यांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नांना यश येत नाही. बीबीसी मृत्यूची बातमी ‘ब्रेक’ करते आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडला जातो. देशानं आपला ‘डॅशिंग’ लाडका नेता कायमचा गमाविलेला असतो. इंदिरापर्व शांत होतं. ‘इंदिरा इज इंडिया’ अशा बिरुदानं लोकसन्मानित असलेल्या इंदिराजींनी जनमानसाची नाडी ओळखली होती. त्यांचा करारी स्वभाव, धाडसी वृत्ती, निर्णयक्षमता यांवर भारतीयांनी भरभरून प्रेम केलं. ‘इंद्रा गांधी’ हा आदरार्थी उच्चार हृदयामध्ये कायमचा कोरला गेला आहे. आणीबाणीनंतर संपूर्ण देश विरोधात उभा होता. शिव्यांची लाखोली वाहून इंदिराजींवर व्यक्तिगत टीकाटिप्पणी सुरू होती. नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या स्वत: पराभूत होऊन काँग्रेस पक्षाची धूळधाण उडाली होती. पराभूत मानसिकतेमध्येच त्यांचा विदर्भ दौरा ठरला. महात्मा गांधी व विनोबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या विदर्भाचं इंदिराजींना विशेष आकर्षण होतं. विनोबाजींचा पवनार आश्रम त्यांचा ऊर्जास्रोत होता. विनोबाजींचे मार्गदर्शनपर आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या इंदिराजींना नागपूर विमानतळावरील जनसागरानं अचंबित केलं. जवाहरलाल दर्डा यांच्या खुल्या जीपमधून त्यांची निघालेली स्वागत मिरवणूक प्रेरणादायी ठरली. तत्कालीन काँग्रेस नेत्यांची सबळ साथ सुखावून गेली. नागपूर, सेवाग्राम, यवतमाळ व अकोला येथील टोलेजंग सभा गाजल्या. वैदर्भीय जनसामान्यांच्या प्रेमामुळे इंदिराजी भारावून गेल्या. मानसिक खच्चीकरण होत असलेल्या इंदिराजींना विदर्भानं मायेचा पदर दिला. विदर्भाच्या ऊर्जेनं प्रेरित झालेल्या इंदिराजींनी नंतर इतिहास घडविला. विदर्भाची भक्कम साथ आणि ममत्व त्यांच्या मनात कायमचं घर करून गेलं हे मात्र तितकंच खरं. विदर्भाच्या मातीत काँग्रेसी विचार खोलवर रुजला आहे. लोक काँग्रेसची सोबत करण्यास सदैव तयार आहेत. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आला आहे; परंतु काँग्रेस नेत्यांची लोकांना साथ देण्याची आंतरिक इच्छा खरंच आहे का? स्वार्थी राजकारण व गटातटात विभागलेल्या काँग्रेसजनांना याचं भान कधी येईल याची लोक प्रतीक्षा करीत आहेत. रंकाचे राव केलेल्या, शिक्षण, सहकार वा तत्सम क्षेत्रात शेकडो सम्राट घडविणाºया, असंख्य मंत्री, मुख्यमंत्री बहाल करणाºया काँग्रेसला आजची स्थिती व्यथित करणारी आहे. देशाच्या अखंड व एकात्मतेसाठी प्राणांचं बलिदान देणाºया ‘आयर्न लेडी’ इंदिराजींकडून काँग्रेसी शिकण्यास तयार नसतील, तर कुणी काहीच करू शकणार नाही. प्रियदर्शनी इंदिराजींची संघर्षवृत्ती अंगी भिनविणं हीच त्यांच्या स्मृतिदिनी खरी आदरांजली ठरेल. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार