सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निष्क्रिय नगरपरिषदेचे मूख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष नगरसेवकांना जाग येण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन

श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समिती नवापूर यांच्या वतीने मा मुख्याधिकारी नवापुर नगरपरिषद यांना शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

Nandurbar MH
  • Jul 5 2021 4:53PM


श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समिती नवापूर यांच्या वतीने मा मुख्याधिकारी नवापुर नगरपरिषद यांना शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवणे बाबत आज निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आम्ही खालील सह्या करणारे श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य आपणास निवेदन करीतो की , महाराष्ट्राची भूमि ही संतांची तसेच जाणता राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी आहे . त्यांच्या कर्तुत्वाने तसेच त्यांच्या पावत चरणस्पर्शाने ती पावन झालेली आहे . शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा नवापूर भूमिशी अप्रत्यक्षरित्या संबंध असल्याचा पौराणिक इतिहास आहे . त्यांच्या पावन चरणस्पर्शाने पावन झालेल्या या नवापूर भूमिवर चिरकाल स्मरण रहावे यादृष्टीने तत्कालीन नगर परिषदेच्या सर्व सदस्यांनी दिनांक २०.०६.२००८ रोजी सर्वसाधारण कोन्सिल ठराव क्र . १६
नवापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणेकामी जागा निश्चित बाबत सभेत विचार विनिमय करण्यात आले . कॉलेज रस्त्यावरील भारतीय स्टेट बैंकेचा पुढील भागातील मोकव्या जागेत छपपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा . त्या कामी योग्य त्या प्राधिकरणाची परवानगी घेण्यात यावी . त्याकामी करण्यात येणाऱ्या कार्यवाही व खास याद्वारे सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती . परंतु , काही नतद्रष्टांनी कपटीपणामुळे पुतळा उभारणीस गोपनीय विरोध करुन त्या जागेऐवजी ज्या जागेवर कधीही पुतळा होणारच नाही . त्या जागेची मागणी करुन विषय रेंगाळत ठेवण्याचा प्रयत्न केला व आजतागायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करुन दरवर्षी शिवजयंतीला पुतळा उभारणार बाबत वल्गना करतात मात्र कार्य शून्य आहे . म्हणून आम्ही खालील सह्या करणारे नवापूर शहर व परिसरातील शिव छत्रपतींचे भक्त मिळून आपणास निवेदन सादर करीतो की , उपरोक्त संदर्भीय ठराव ग्राह्य धरुन सदरच्या जागेवर शिव छत्रपतींचा आश्वरुढ पुतळा कमीत कमी पुढच्या तिथी नुसार येणाऱ्या शिवजयंती पर्यंत तरी व्हावा या हेतुने उपाययोजना करावी व केलेल्या उपाय योजनेचे उलट - टपाली उत्तर मिळावे बाबत आपणास विनंती करण्यात आली होती . परंतु , यावर चार महिन्यांचा कालावधी लोटला असून देखील आपल्या विभागाकडून काहीही कार्यवाही झालेली नसल्याचे निदर्शनास येत आहे . तरी सदर पत्र आपल्या विभागास प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या आंत कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आगामी १५ ऑगस्ट २०२१ रोजी शासकीय ध्वजवंदनाच्या ठिकाणी पोलीस स्टेशन आवार , नवापूर येथे निष्क्रिय नवापूर   नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना जाग येण्यासाठी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे . तरी कृपया याची नोंद घेऊन कार्यवाही करावी . यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील . प्रत रवाना : ०१ . मा . तहसिलदार सो .. , नवापूर ता.नवापूर जि.नंदुरबार ०२ . मा . पोलीस निरीक्षक सोर . , नवापूर पोलीस स्टेशन , नवापूर जि.नंदुरबार निवेदनावर खालील प्रमाणे सह्या आहेत गणेश भानुदास वडनेरे राजेश सोमनाथ सोनी अनिल मोहन वसावे शंकर जगदीश दर्जी अजित यशवंत पाथरकर निलेश बाबुभाई देसाई किरण टिभे संजय सुरेश सोनी प्रशांत ठाकरे गोविंद राजाराम मोरे श्याम नारायण गावीत राजेश जगन गोसावी निलेश जयंतीलाल प्रजापत डॉ.अमित शिवाजी मावची आनंदराव ध्रुव वाघ महेंद्र नेरकर घनश्याम मगनलाल परमार प्रा.कमलेश पाटील जिग्नेश पंचाल अँड.वृतुल भानुदास कुलकर्णी अशोक भरवाड संजय पोपटराव सोनवणे  योगेश सोनार कुणाल दुसाणे  जगदिश जयस्वाल मुकेश चावला सुनिल छोटू पवार अॅड , मोहित शर्मा संदिप पाटील मयुर लक्ष्मण टिभे मनोज बोरसे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार