सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धक्कादायक: वीजबील वसुलीतून 27 लाखाचा अपहार; तब्बल दीड वर्षानंतर उघड; सहायक लेखापाल अटकेत*

नंदुरबार - येथील विज ग्राहकांकडून घेतलेल्या विजबिल

Nandurbar. MH
  • Mar 8 2021 4:11PM
नंदुरबार - येथील विज ग्राहकांकडून घेतलेल्या विजबिल रक्कमेतून सुमारे २६ लाख ८८ हजार ८९२ रुपये ईतक्या रकमेचा अपहार झाल्याचे तब्बल दीड वर्षानंतर उघडकीस आले. याप्रकरणी सहाय्यक लेखापालास अटक करण्यात आली असली तरी वसुलीची रक्कम बँकेत नियमित भरणा केली गेली नाही, ही बाब उघडकीस यायला दीड वर्षकालावधी लागला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उप विभागाचे अतिरिक्त अभियंता धिरज दुपारे यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जितेंद्र गुलाब ठाकरे वय-४५ हा म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित अंतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंता, नंदुरबार (शहर) उप विभाग यांच्या कार्यालयात सहाय्यक लेखापाल, नंदुरबार (शहर) उप विभाग या पदावर कार्यरत होता. सदर कार्यालयात विज भरणा केंद्रामार्फत ग्राहकांकडून विजबिल वसुलीची रक्कम जमा होते. ती रक्कम देना बँकेत भरणा करणे आवश्यक असते. असे असतांना सहाय्यक लेखापाल, ठाकरे याने मे २०१९ ते माहे सप्टेंबर २०१९ या कालावधीत कार्यालयीन विजबिल वसुलीची एकूण रक्कम २६,८८,८९२/- रू. रोख रक्कम आज पावेतो देना बँकेत जमा केली नाही. फिर्यादी यांचे कार्यालयास ओसीसीएस (OCCS) प्रणालीनुसार निदर्शनास आले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर सहाय्यक निरीक्षक थोरात, उपनिरीक्षक दिगंबर शिंपी यांनी ताबडतोब भेट देऊन तपासणी केली. त्यानंतर ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार