सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धक्कादायक प्रकार: बिबटे मारून अवयव काढले, नवापूर तालुक्यात टोळी पकडली

बिबटे मारून अवयव काढले, नवापूर तालुक्यात टोळी पकडली

Nandurbar MH
  • Dec 23 2020 10:35AM
नंदुरबार - बिबट्यांना विष घालून मारले नंतर त्यांचे पंजे तोडले तसेच मिशा,नखेही उपटले; असा भयानक प्रकार केल्याचे आढळून आले आहे. नवापुर तालुक्यातील गडदाणी जंगलात हा अघोरी प्रकार घडवणारी टोळी चिंचपाडा नवापूर वनविभागाने पकडली. 8 संशयितांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
 अधिक वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. काही पाळीव प्राण्यांवर त्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. शनिवार दिनांक 19 डिसेंबर रोजी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गडदाणी जंगलात बिबट्या वाघाला मारून जमिनीत पुरले असल्याची माहिती वनखात्याला मिळाली. ही माहिती मिळताच चिंचपाडा  वनविभागाचे वनअधिकारी आर.बी. पवार, उपवनसंरक्षक कवठे, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार हे विसरवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह जंगलातील त्या ठिकाणी पोहोचले. एक खोल खड्डा करून त्यात मेलेला बिबट्या गाडलेला त्यांना आढळून आला. कुजलेल्या अवस्थे वरून त्याला मारून काही दिवस उलटल्याचे स्पष्ट झाले. नख, मिशा, पंजे दिसले नाही. त्यांनी लगेचच तपास चक्र फिरवले. दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अधिक तपास करून  रविवारी आणखी चार जणांना  ताब्यात घेतले. तेव्हा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पशूला लाजवेल इतका भयानक प्रकार माणसांनी केल्याचे त्यांना पाहायला मिळाले. आणखी एक बिबट्या मारून गडदाणी जंगलात जमिनीत गाडल्याची माहिती त्या संशयितांनी दिली. या अधिकाऱ्यांनी आज सोमवार दिनांक 21 रोजी पुन्हा जंगल परिसरात खोदून पाहिले असता दुसरा बिबट्या जमिनीखाली पुरलेल्या व कुजलेल्या अवस्थेत मिळाला. त्याचेही चारही पंजे नखे आणि मिशा काढण्यात आल्या होत्या. बिबट्याचे अवयव काढून विकण्यासाठी हा अघोरी प्रकार केला असावा काय? याची खात्री करणारे पुरावे आता वनखात्याचे पथक मिळवत आहे. दरम्यान  पशुवैद्यकीय  अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली  तसेच  विसरा  तपासणीसाठी  प्रयोगशाळेत  पाठविण्यात  आला. शवविच्छेदन करून  दोन्ही बिबट्यांवर अंतिम संस्कार देखील करण्यात आले. आज सोमवार रोजी आणखी 2 जणांना ताब्यात घेतल्यामुळे अटकेतील संशयितांची संख्या 8 झाली आहे. आणखी तिसरा बिबट्या त्यांनी मारला असल्याची परिसरात चर्चा आहे. माहिती देण्यास ग्रामस्थ पुढे येत नसल्यामुळे तपास आव्हानात्मक असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. वन्य पशूंची शिकार करणारी व  त्यांचे अवयव काढून विकणारी टोळी कार्यरत आहे काय? या दिशेने तपास सुरु करण्यात आला आहे. जळगाव येथील वन अधिकारी, नंदुरबारचे मोबाईल स्कॉड, नवापूर मोबाईल स्कॉड देखील घटनास्थळी उपस्थित होते. ही वेगवेगळी पथके कार्यरत झाले आहेत. लवकरच आणखी धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होत आहे. मंगळवार दिनांक 22 डिसेंबर रोजी या सर्व संशयितांना न्यायालयात उभे केले जाणार आहे. दरम्यान पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी हल्ले केल्यामुळे ही अघोरी कृती केली गेली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु पाळीव प्राणी मरतात म्हणून माणसांनी वन्य पशूंची हत्या करणे समर्थनीय ठरत नाही. वन्य पशू आढळल्यास  घाबरून न जाता  परस्पर त्याची कोणी हत्या करू नये. वनखात्याच्या या क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी. वन्यजीवांना देखील जगण्याचा अधिकार देण्याची वृत्ती लोकांनी वाढवावी; असे आवाहन वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार