सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धक्कादायक: बेशुद्ध पडलेल्या रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले, राजावाडी पालिका रुग्णालयातील गंभीर प्रकार

राजावाडी पालिका रुग्णालयातील गंभीर प्रकार

Sudarshan MH
  • Jun 23 2021 6:11AM
 
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. श्रीनिवास यल्लपा असे या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. श्वास घेताना दम लागत असल्यामुळे या तरुणाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा तरुण अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत असताना हा प्रकार घडला. 
 
मेंदूज्वर झाल्याने तरुण रुग्णालयात दाखल
 
मिळालेल्या माहितीनुसार श्रीनिवास यलप्पा या तरुणाला श्वास घेताना दम लागत होता. नंतर त्रास असह्य झाल्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या तरुणाला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले. या बाबतचे उपचार घेत असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. नंतर नातेवाईकांनी तपासले असता तरुणाच्या डोळ्यांना उंदराने कुरतडले असल्याचे समजले.
 
नर्सकडून कुटुंबीयांना उद्धटपणे उत्तरे
 
हा प्रकार समजल्यानतर तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील नर्सना विचारले असता नर्सने त्यांना उद्धटपणे उत्तरे दिली. तसा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. नंतर हा प्रकार सार्वजनिक झाल्यानंतर राजावाडी येथील मनपा रुग्णालय प्रशासनावर सर्वत्र टीका झाली. तसेच परिसरात मोठी खळबळ माजली. या प्रकारामुळे रुग्णालयात ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तेसुद्धा काही काळ चिंतेत पडले.
 
सुरक्षेचे उपाय करीत आहोत
 
दरम्यान, ज्या आयसीयू रूममध्ये ही घटना घडली त्या तळमजल्यावर उंदरांचा वावर आहे. श्रीनिवास यांना उंदराने चावा घेतला असल्याचे दिसते आहे. याबाबत सुरक्षेचे उपाय करीत आहोत, असे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार