सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा तालुक्यात शिवसेना संपर्क अभियानाला सुरवात

अक्कलकुवा तालुक्यात नंदुरबार जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते शिवसेना संपर्क अभियानाला सुरुवात

Nandurbar MH
  • Jul 15 2021 7:47AM


नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
   अक्कलकुवा तालुक्यात नंदुरबार जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते शिवसेना संपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली यावेळी तालुक्यात विविध ठिकाणी  शाखा फलकांचे उदघाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी उपस्थित होते
     शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री  उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिव संपर्क अभियाना अंतर्गत  तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजयजी राऊत व नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख श्री बबनराव थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाने व नंदुरबार जिल्हा प्रमुख श्री आमश्या दादा पाडवी यांचा नेतृत्वात सोरापाडा , गलोठा,उमरकुवा,पेचरिदेव,पोराम्बी ता.अक्कलकुवा येथे दि.14/7/2021 रोजी फलक अनावरण करण्यात आले
       शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दि १२ जुलै २४ जुलै दरम्यान शिवसेना संपर्क अभियान राबविण्यात येत आहे त्यानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा, गलोठा उमरकुवा, पेचरीदेव, पोरांबी येथे शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले यावेळी त्यांनी बोलताना  सांगितले कि  अक्कलकुवा तालुक्यातील शिवसैनिकांनी कोरोना महामारीमुळे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी विमा काढणे आवश्यक आहे त्यासाठी मी स्वखर्चाने तालुक्यातील सर्व शिवसैनिकांचा विमा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख  उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काढणार  असुन आपण जास्तीत जास्त शिवसैनिकांनी त्याचा लाभ घ्यावा.यावेळी  खापर गावाचे माजी उपसरपंच तथा नंदुरबार शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले यांनी बोलताना सांगितले की तालुक्यातील शिवसैनिकांनी शिवसेना फलकाची काळजी घेऊन सन्मान राखावा तसेच अक्कलकुवा/धड़गाव विधानसभा मतदार संघात कोविड 19 लसिकरण बाबत जनजागृती करणे व गाव तिथे शिवसेना शाखा व घर तिथे शिवसैनिक तयार करण्याबाबत आवाहन केले. खापर येथील माजी उपसरपंच ललित जाट यांनी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रत्येक घरा घरात पोहचतील यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे यावेळी नंदुरबार जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले,खापर ग्रामपंचायतीचे उपसरपंच ललित जाट,नंदुरबार जिल्हा शिवसेना युवा जिल्हाधिकारी विनोद वळवी,, तालुका उप प्रमुख तुकाराम वळवी, जिल्हा परिषद सदस्य शंकर पाडवी, पंचायत समिती सदस्य जेका पाडवी, काठी संस्थानचे राजेपृथ्वी पाडवी, सुरेश वसावे, वसंत पाडवी् सरपंच राजेंद्र वसावे , भिमसिंग पाडवी, सोरापाडा सरपंच छोटूलाल पाडवी,खापर शहर प्रमुख जसराज पवार, कुलदीप टाक, विनोद वळवी,सुरेश तडवी,अमरसिंग वळवी,तसेच विविध शाखाप्रमुख व तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित आदि होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित जाट यांनी तर सुत्रसंचालन जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले यांनी केले व आभार युवा उपजिल्हाधिकारी रोहित चौधरी यांनी मानलेत

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार