गुंडाच्या तावडीतून तरुणाला वाचणनाऱ्या सुजाता मुगदिया यांचा सत्कार
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला रणरागिणीचा सत्कार संभाजीनगर : शहरात दिवसेंदिवस गुंडाची दहशत वाढली आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला रणरागिणीचा सत्कार
संभाजीनगर : शहरात दिवसेंदिवस गुंडाची दहशत वाढली आहे. यातच शिल्लेखाना येथील काही गुंडांनी अजबनगर येथील सुयश शिरसाठ या तरुणास बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सामाजिक कार्यकर्त्या सुजाता मुगदिया यांनी जीव धोक्यात टाकून तरुणाचा जीव वाचवला.
यामुळे त्यांचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सत्कार करत कौतुक केले.
यावेळी शहरात वाढणारी गुंडागर्दी पोलिसांनी थांबवावी, अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला.
या सत्कारप्रसंगी शिवसेना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख गणू पांडे, उपशहर प्रमुख सतीश कटकटे, उपशहर संघटक किरण शर्मा, स्मिता जोशी, सुनीता सोनवने, सुष्मा यादगिरे, नारायण जाधव, सुयश शिरसाठ उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प