महाराष्ट्र संभाजीनगर
संभाजीनगर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणावर विराजमान झालेले शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्व पक्षांचे सर्व दिग्गज नेते त्यांच्या स्मारकास अभिवादन करत आहेत . बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रातील सर्वात प्रिय शहर संभाजीनगर होते. व बालासाहेब ठाकरे यानी ३२ वर्षांपूर्वी या शहराचे नाव संभाजीनगर ठेवले होते, आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतांना बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले संभाजीनगर हे नाव लवकरच या शहराला द्यावे, अशी प्रत्येकाची मागणी आहे. तर संभाजीनगर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर फुलांचा वर्षाव करण्यात येत असून बाळासाहेब परत परत या, अशा घोषणा दिल्या जात आहेत.