सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रस्त्यावरील जमीन धसल्याने बस उलटली शिंदखेडा तालुक्यातील वरखेडा गावाजवळ घडली ही घटना

शिंदखेडा - मुसळधार पावसाने राज्‍यात हाहाकार माजवला असताना धुळे जिल्‍ह्यात रिमझिम पाऊस होत आहे.

Nandurbar MH
  • Jul 28 2021 11:47AM

सुदैवाने जीवित हानी टळली

  शिंदखेडा - मुसळधार पावसाने राज्‍यात हाहाकार माजवला असताना धुळे जिल्‍ह्यात रिमझिम पाऊस होत आहे. यामुळे देखील रस्‍त्‍यांची समस्‍या होत आहे. यात वालखेडा गावाजवळ रस्‍त्‍याच्‍या कडेवरची जमिन खचल्‍याने प्रवाशांनी भरलेली बस उलटली. सुदैवाने यात हानी झाली नाही. 
शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा गावाजवळ सोनगीरहून अमळनेरकडे जाणारी बस (क्र. MH २०, BL १४१८) रस्त्याच्या खाली उतरताच भुसभुशीत झालेल्या जमिनीमुळे जागीच पलटी झाली. जमीन धसल्यामुळे ही बस अचानक पलटी झाली आहे. बसमध्ये १५ ते २० प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नसून सुदैवाने या दुर्घटनेमध्ये जीवित हानी टळली आहे.
त्यात प्रवाशी झाले भयभीत
अचानक रस्‍त्‍यावरून बस पलटी झाल्‍याने सर्व प्रवासी भयभीत झाले होते. आरडाओरड देखील झाली. मात्र बसचा खालचा भाग टेकला गेल्‍याने बस उलटी झाली झाली नाही. यामुळे प्रवाशांना इजा झाली नाही. परिसरातील नागरिकांनी तात्काळ सर्व प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले. या दुर्घटनेमध्ये बसच्या एका बाजूच्या संपूर्ण काचा फुटल्याने बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार