सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*निमंत्रण मिळालं तरी मी अयोध्येला जाणार नाही. शरद पवारांचं ठाम वक्तव्य*

काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं असं शरद पवार म्हणाले होते, या विधानावरुन अनेक वाद झाले होता.

Snehal Joshi .
  • Jul 28 2020 7:37PM
अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत भिन्न मते आहेत, राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत शरद पवारांनी विधान केले होते. कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं असं शरद पवार म्हणाले होते, या विधानावरुन अनेक वाद झाले होता. तर शिवनेरी ची माती आम्ही अयोध्येला नेल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या देवळाच्या विषय पुढे सरकला आणि मार्गी लागला असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले होते. तर सोबतच अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार, नाहीतर तुम्ही व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे ई-भूमीपूजन करू शकता, असेही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता याबाबत शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे, राम मंदिराबाबत कोणताही वाद नाही, सुप्रीम कोर्टाने हा वाद मिटवलेला आहे, राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही, परंतु निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे असं सांगत. त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे. एका सुप्रसिद्ध न्यूज चॅनल ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार