सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भुमाफियांना हादरा? जमीनीचे बोगस कागदपत्र बनवल्याप्रकरणी भुमी अभिलेखाच्या लिपिकावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ

नंदुरबार - शिरस्तेदाराची बनावट सही शिक्का ठोकून व बोगस चलनपावती बनवून खोटे परस्पर चुकीचे मोजमाप नोंदवून जमिन घोटाळा

Nandurbar MH
  • Mar 25 2022 11:54AM

नंदुरबार - शिरस्तेदाराची बनावट सही शिक्का ठोकून व बोगस चलनपावती बनवून खोटे परस्पर चुकीचे मोजमाप नोंदवून जमिन घोटाळा केल्याप्रकरणी नंदुरबार येथील भुमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकाविरुध्द नंदुरबार शहर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे भ्रष्टाचारी कर्मचार्‍यांच्या मार्फत जमीन माफियांनी येथील भुमी अभिलेख कार्यालयातील कारभार ताब्यात घेऊन कसा धुमाकूळ घातला आहे, याला वाच्यता फुटली आहे. सुदर्शन न्यूजने यापूर्वी देखील जमीन माफियांच्या असल्या गैरकारभाराला उजेडात आणण्याचे काम केले होते.


हाती आलेली माहिती अत्यंत खळबळजनक असून जमीन माफियांचे मोठे घोटाळे उघड होण्याची शक्यता यावरून व्यक्त केली जात आहे. तथापि तितकी खोलवर चौकशी होऊन कार्यवाही होईल का? हा खरा प्रश्‍न आहे. प्राप्त माहितीनुसार एक सामान्य शेतकरी राजेंद्र दर्यावसिंह रघुवंशी, रा.परदेशीपुरा, नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूमि अभिलेख कार्यालय,नंदुरबार येथील छाननी लिपिक फारुख निसार पिंजारी याच्याविरोधात नंदुरबार शहर पोलिसठाण्यात काल रात्री म्हणजे २४ मार्च २०२२ रोजी रात्री १० वाजून ४८ मिनिटांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हा सर्व फसवणुकीचा प्रकार १५ मे २०२१ ते २४ मार्च २०२२ या कालावधीत घडल्याचे नमूद करून राजेंद्र रघुवंशी यांनी फिर्यादीत म्हटलेे आहे की, त्यांचे होळ तर्फे हवेली शिवारात 66.67/1 व 68 असे शेत गट असून ते व त्यांचा मुलगा हा तिथे शेती करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो. सन 2014 साली राजेंद्र रघुवंशी यांनी भुमिअभिलेख कार्यालय, नदुरंबार यांच्याकडून शेत गट क्रमाकं 67 व 68 यांची पोट हिस्सा मोजणी केली होती. त्यानुसार त्यांचे क्षेत्र हे 67 मध्ये बरोबर होते परंतु मुलाच्या नावे असलेला शेत गट क्रमाकं 68मध्ये त्यांनी रेल्वेलाईनची जमीन या शेतात दाखविली होती. आम्हाला क प्रत प्राप्त झाल्यावर ती बाब समजली. त्यानंतर मी सन 2017 मध्ये 67/2अ ची हद्दकायम मोजणी साठी भुमिलेख कार्यालय येथे अर्ज केला. कायदेशीर 3000/- रुपयाचे चलन भरले. या अर्जानुसार 67/2 अ ची हद्दकायम मोजणी करण्यात आली. ती भुकरमापक नरेद्र सोनवणे यांनी शेतात येवून मोजणी केली होती व मला सदर कार्यालयामार्फत टपालाने क प्रत पुरविण्यात आली होती. त्यावर मला संशय आल्याने मी शिट मोजमाप कामी ऑफिसला गेलो असता फारूख निसार पिजारी याने सदर शिटचे मोजमाप केले असता माझ्या शेताची पुढील बाजू 18 63 मीटर भरत असल्याचे माझ्या लक्षात आले तेव्हा मी त्यांना याबाबत सांगीतले असता त्यांनी मान्य केले की चुकून सदरची शिट तयार झाली आहे. असे नमूद करून फिर्यादीत रघुवंशी यांनी म्हटले आहे की, त्यांनतर 10 दिवसात छाननी लिपीक फारूख निसार पिजारी यांचे मार्फतीने मला सदर शेताची पुन्हा क प्रत टपालाने पुरविण्यात आली. खात्री करण्यासाठी खाजगी इंजिनिअयरला सदर शिट दाखविली. त्यावेळी पुन्हा ती 70 मीटरचीच असल्याचे आढळले. परंतु वास्तवात 2014 ती याच क्षेत्राची पुढील सिमा ही 70.20 मीटर अशी दिसत होती. म्हणून आम्ही वेळोवेळी भुमिलेख कार्यालय, नंदुरबार येथे याबाबत अर्ज केले.  परंतु आम्हाला समाधानकारक उत्तर भेटले नाही, तरी मी माझा प्रयत्न चालूच ठेवला. त्यानंतर मी सन 2021 मध्ये मी व माझा मुलगा सदर मोजणी शिटची क प्रत घेवून भुमिअभिलेख कार्यालय, नदुरबार येथे गेलो. तेथे हजर असलेले शिरस्तेदार सुभाष जगन्नाथ मोरे यांनी सदर मोजणी शिट पाहीली असता त्यांनी त्यावरील शिरस्तेदार म्हणून केलेली सही त्यांची नाहीच. असे समजल्यावरून खात्री झाली की, फारुक निसार पिंजारी याने आमची फसवणुक केली आहे. आम्हाला बनावट शिट पुरविली आहे. 

तसेच 15/5/2021 रोजी मी शेत गट क्रमांक 66 सीट क मोजणी साठी येथे अर्ज करण्यासाठी गेलो असता छाननी लिपीक फारुख निसार पिजारी यांनी नेट बंद असल्याचे सांगितले होते. तुम्ही माझ्याकडे 6000/- रुपये देवून द्या मी चलन भरून घेईल व त्याची पोच पावती आपणास घरी येवून देतो, असेही सांगितले होते. त्यावरून मी लहान मुलगा अभय रघुवंशी यांचे समक्ष त्यास रोख 6000/- रुपये दिले. दोन ते तीन दिवसानंतर त्याने मला एका चलनाची झेरॉक्स प्रत दिली व सांगितले की, तुमचे चलन भरण्यात आले आहे. वास्तवात त्याने तसे काहीही केले नव्हते हे नंतर उघड झाले. त्यामुळे माहीती अधिकारात चलनाची मागणी केली असता मला लेखी उत्तर दिले नाही. जनमाहिती अधिकारी दिलीप बावीस्कर यांना याबाबत भेटलो असता त्यांनी तोंडी सांगीतले की, सदर प्रत रेकॉर्डवर नाही. त्यावरून माझी खात्री झाली की, फारूख निसार पिजांरी याने स्वताचे आर्थिक फायद्यासाठी चलनाची बनावट प्रत देवून बनावट सही असलेले मोजणी शिट पुरविले. या फिर्यादीत वरून नदुरबार शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने भारतीय दंड संहिता १८६०चे कलम ४०९,४६५,४६७,४६८,४२० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस उपनिरिक्षक प्रविण पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार