सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आमदार निलेश लंकेंच्या त्या कामाची महाराष्टात चर्चा.......

नगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून आमदार निलेश लंके यांनी रुग्णांना दिलासा देनारी अनेक कामे केली ,ठीकठीकानी कोविड सेंटर उभारले.

Sudarshan MH
  • May 8 2021 8:33PM
अहमदनगर(रावसाहेब पारधी)
          पारनेर 

नगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून आमदार निलेश लंके यांनी रुग्णांना दिलासा देनारी अनेक कामे केली ,ठीकठीकानी कोविड सेंटर उभारले.
तसेच आपला मुक्कामच कोविड सेंटरमध्ये ठोकला.
    त्यांच्या कामाचे शरद पवार यांनी सुद्धा कौतूक केल्याने राज्यभर लोकनेत्यांच्या कामाची चर्चा सुरू झाली आहे.

लंके यांनी आधी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी 1 हजार बेडचं कोविड सेंटर उभारलं. इतकंच नाही तर आता ते व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.


या कठीण काळात कोरोना रुग्णांना बेड मिळावा यासाठी अनेक प्रयत्न करावे लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये लंके यांनी दोन ठिकाणी एक हजार बेड्सचे कोविड सेंटर उभारले. फक्त सेंटर उभारुन ते थांबले नाहीत, तर रुग्णांच्या जेवणाची, उपचाराची आणि इतरही सर्व सुविधा त्यांनी याठिकाणी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या या कामाची दखल शरद पवारांनीदेखील घेतली होती. याच कारणामुळे लंके आधीच चर्चेत असताना आता पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय ठरत आहेत. यावेळी कारण आहे लंके यांचा व्हायरल झालेला एक फोटो. रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन देत लंके थांबले नाहीत. तर, रुग्णांची काळजी घेता यावी म्हणून त्यांनी कोविड सेंटरमध्येच मुक्काम ठोकला. हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये लंके अंगावर घेण्यासाठी चादर आणि डोक्याखाली घेण्यासाठी उशी नसतानाही सामान्य नागरिकांसोबत जमीनीवर झोपल्याचं पाहायला मिळत आहे. कोणताही मोठेपणाचा आव न आणता ते शांतपणे झोपल्याचं यात दिसत आहे. हा फोटो राष्ट्रवादी काँग्रेस अपडेट या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या कठीण काळात सामान्य जनतेसोबत राहून त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी लंके यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे. याच कारणामुळे लंके पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या या कामाचं कौतुक होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार