सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हदगाव तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे दुसरे ट्रेनिंग संपन्न

ग्रामपंचायत निवडणुकीचे दुसरे ट्रेनिंग संपन्न

Sudarshan MH
  • Jan 10 2021 10:51AM
हदगाव दि.10(अरविंद जाधव) तालुक्यामध्ये माहे डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021या कालावधीमध्ये एकूण 108 ग्रामपंचायतीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याच अनुषंगाने दिनांक 4 जानेवारी 2020 रोजी 13 ग्रामपंचायत ची बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे उर्वरित 95 ग्रामपंचायत ची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने हदगाव तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी श्री जीवराज डापकर यांचे मार्गदर्शन तसेच तहसीलदार हदगाव यांच्या आदेशान्वये विविध पथकाची स्थापना करण्यात आलेली असून सर्व पथकामार्फत अत्यंत कमी वेळेमध्ये व कालावधीमध्ये  निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे ,त्याच अनुषंगाने दिनांक 2 जानेवारी 2021 रोजी पहिले प्रशिक्षण मतदान अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आलेले आहे तसेच सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुसरे प्रशिक्षण आज दिनांक 9 जानेवारी रोजी देव उखळाई आश्रम डोंगरगाव रोड व मागासवर्गीय मुलींचे मुलांचे वस्तीग्रह तामसा रोड हदगाव येथे  देण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी दुसऱ्या ट्रेनिंग करीता एकूण 1419 अधिकारी व कर्मचारी यांना वारंट तामील करण्यात आलेले आहेत.  त्यापैकी आज प्रशिक्षणासाठी एकूण 11 प्रशिक्षणार्थी अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याने त्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आलेले आहे, सदर प्रशिक्षण  उपविभागीय अधिकारी श्री जीवराज डापकर यांचे मार्गदर्शन व तहसीलदार हदगाव यांचे आदेशानुसार तसेच श्रीमती स्नेहलता स्वामीं नायब तहसीलदार, श्री जी डी हराळे नायब तहसीलदार, श्री जाधव डी एन नायब तहसिलदार , श्री विजय येरावाड नायब तहसीलदार यांचे अधिपत्याखाली घेण्यात आले. एकंदरीत हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया निवडणूक विभागाकडून तसेच महसूल विभागाकडून पूर्ण करण्यात आलेली असून त्याकरिता वेळेवर प्रशिक्षण देण्यात आली असून विविध पथकाचे पूर्ण कामे पूर्णत्वाकडे झालेली आहेत याच अनुषंगाने वाहनव्यवस्थापन कक्षाने वाहन पार्किंगची व्यवस्था सुसज्ज स्थितीमध्ये तामसा रोड हदगाव येथे करण्यात आलेली असून युद्ध पथकाने देखील कामे पूर्ण केली आहेत ,त्यामुळे निवडणुकीची कोणतीही बाब सद्यस्थितीमध्ये  राहिलेले नाही. यामुळे निवडणूक विभाग महसूल प्रशासन येणाऱ्या 15 जानेवारी 2022 रोजी च्या ग्रामपंचायत च्या मतदान ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे सदर कामे निवडणूक विभागातील अव्वल कारकून श्रीमती कदम ,लिपिक श्री वैभव घोडे ,ऑपरेटर समीर, कार्यालयातील कर्मचारी,  क्षत्रिय अधिकारी कर्मचारी , तसेच विविध कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी तलाठी जनार्दन मुगल,  लेखापाल सतीश देशमुख  नगरपरिषद हदगाव ,हे परिश्रम घेत आहेत सदरची माहिती मीडिया कक्ष प्रमुख संजय गोडबोले ,सहाय्यक विशाल शेवाळकर ,प्रीती माने विस्ताराधिकारी ,माधुरी दळनकर, प्रियंका पिनलवार, संतोष खंदारे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार