सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमध्ये नैतिकता असेल तर राजीनामा दयावा : आ.कृष्णा खोपडे

असेल तर राजीनामा दयावा : आ.कृष्णा खोपडे

Snehal Joshi. MH
  • Apr 5 2021 9:39PM
 
नागपूर : उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून सर्व क्षेत्रात अपयशी मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे. या दिड वर्षाचे कालावधीत धनंजय मुंडे, संजय राठोड, अनिल देशमुख या मंत्र्यांचे काळे कारस्थान महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घडलेली आहे. वाझे / परमवीरसिंग प्रकरणात त्याच वेळेस देशमुखांचा राजीनामा घेतला असता तर त्यांची नैतिकता दिसली असती. परंतु शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे भ्रष्ट्राचाराचे महामेरू असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. उद्धव ठाकरे हे राज्यातले पहिले अपयशी मुख्यमंत्री ठरल्यामुळे त्यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा दयावा.
 
उच्च न्यायालयाचे स्वागत ! पण देशमुखांची नैतिकता कसली?
 
जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात गंभीर बाब असल्यामुळे सी.बी.आय. चौकशीचे आदेश त्यांचे सर्वांनी स्वागत केले असून अनिल देशमुखाचा राजीनामा यात नैतिकता कसली? परमवीर सिंग यांनी ज्या दिवशी 100 कोटींचा आरोप लावला होता. त्याच दिवशी राजीनामा दिला असता टर त्यांची नैतिकता सिद्ध झाली असती.
 
उच्च न्यायालयाची उद्धव ठाकरे यांना चपराक
 
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अनिल देशमुख यांनी नियमात बदल करून सीबीआय राज्यामध्ये कोणतीही चौकशी करणार नाही, असे त्यांनी वाजा-गाजा करून आदेश काढले होते. उच्च न्यायालयाने परमवीर सिंग प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे तोंड काळे झाले आहे. आता सीबीआय चौकशीला थांबवणार आहे कां?
 
फक्त मुंबई येथील 100 कोटी खंडणीमध्ये कॉंग्रेसचा हिस्सा किती ?
 
कॉंग्रेसचे पप्पू व शिवसेनेचा पोपट यांचे तोंड बंद कां?
 
फक्त मुंबई येथील 100 कोटीचा प्रति महिना खंडणी प्रकरणात कॉंग्रेसचा हिस्सा किती? हे आता कॉंग्रेसचे पप्पू नाना पटोले यांनी जाहीर करावं, या तिकडम सरकारमध्ये कॉंग्रेसची महत्वपूर्ण भूमिका असून नामुष्की झाली असल्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगावं. शिवसेनेचे बोलके पोपट संजय राऊत खामोश कां? त्यांनी सांगाव की मुख्यमंत्र्यांचा हिस्सा किती होते!

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार