सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य शासनांकडून निराधार लाभार्थ्यांवर अन्याय ५ महिन्यांपासून अनुदान राशींचे वाटप नाही:-प्रवीण दटके

राज्य शासनाद्वारे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या निराधार लाभार्थ्यांना मागील ५ महिन्यांपासून अनुदान राशी न केल्यामुळे नागपुरातिल हजारो विधवा, दिव्यांग व गरिब लाभार्थी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लहान मुलांवर फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

Snehal Joshi .
  • Oct 7 2020 7:26PM
राज्य शासनाद्वारे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या निराधार लाभार्थ्यांना मागील ५ महिन्यांपासून अनुदान राशी न केल्यामुळे नागपुरातिल हजारो विधवा, दिव्यांग व गरिब लाभार्थी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लहान मुलांवर फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान राशीची अडवणूक करून त्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप नागपुर महानगर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार प्रविण दटके यांनी केला आहे . जर येत्या ५ आॅक्टोंबर पर्यंत निराधार लाभार्थ्यांना अनुदान राशीचे वाटप करण्यात आले नाही तर भाजपा तर्फे तिव्र आंदोलनाचा निर्धार प्रविण दटके यांनी व्यक्त केला आहे. नागपुर शहरांत जवळपास १ लाख चे सुमारास निराधार लाभार्थी असून यामध्ये प्रमुखतेने संजय गांधी निराधार योजना ज्या मध्ये विधवा महिला, दिव्यांग व्यक्ति, दुर्धर आजाराने पिडीत व्यक्ति, मतिमंद व्यक्ति व अनाथ मुले यांचा समावेश होतो. तसेच श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेत ६५ वर्षावरिल वृध्द पुरूष व महिला यांचा समावेश आहे. संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विधवा महिलेस कमाल १२०० रू.व इतर लाभार्थ्यांस किमान १००० रू. तसेच श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यास १००० रू. दरमहा अनुदान देण्यात येते. ह्या दोन्ही योजनेचे लाभार्थी समाजातील अत्यंत दुर्बल घटकांशी संबंधीत असल्याने त्यांचे करिता या अनुदान राशीची फार गरज असते. महाराष्ट्र सरकारने एप्रिल २०२० पासून अनुदान राशी न पाठविल्यामुळे निराधार लाभार्थ्यांना मागील ५ महिन्यांपासून अनुदान राशी चे वाटप करण्यात आलेले नाही. राज्य सरकारची ही अक्षम्य लापरवाही असून राज्य सरकार निराधार लोकांवर अत्याचार करित असून त्यांचे जीवितासोबत खेळ करित आहे.राज्य सरकारच्या या उपेक्षेमुळे बहुतांश विधवा माया भगिनी ज्यांना लहान मुले आहेत त्यांना व अतिवृध्द निराधार व्यक्ति ज्यांचा औषधोपचाराचा खर्च या अनुदानावर भागायचा त्यांना अतिशय त्रास होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील राज्यात कधीही निराधारांवर ह्या प्रकारचा अन्याय झालेला नाही. आज सरकार स्थापन झाले नंतर १० महिनेचा कालावधी होवूनही संजय गांधी निराधार योजना अनुदान समिती चे गठन झाले नाही या वरूनच राज्य सरकार निराधारांच्या समस्येबद्दल किती गंभीर आहे हे लक्षात येते. नागपुर महानगर भारतीय जनता पार्टी मागणी करते कि निराधार लाभार्थ्यांना त्वरित संपूर्ण ५ महिन्यांचे बकाया अनुदान राशीचे वाटप करावे. जर ५ ऑक्टोबर पर्यंत अनुदान राशीचे वाटप न केल्यास नागपुर महानगर भारतीय जनता पार्टी द्वारे तिव्र आंदोलन करण्यात येईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार