सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संजय राऊतांविरोधात आणखी एक खटला चालणार

कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांविरोधात मेधा सोमय्या यांनी मानहानीचा खटला दाखल केला

Abhimanyu
  • Aug 18 2022 7:56PM
मुंबई : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेल्या संजय राऊतांविरोधात आणखी एक खटला चालणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमया यांनी कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. यावर आज सुनावणी झाली. यावेळी राऊत यांनी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीचा आरोप अमान्य असल्याचे कोर्टाला सांगीतले. कोर्टाने सुनावणीसाठी नवीन तारीख दिली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा आरोप करत थेट कोर्टात खटला दाखल केला आहे. यावर आज सुनावणी झाली तेव्हा संजय राऊत यांनी मानहानीचा आरोप अमान्य असल्याचे शिवडी न्यायालयाला सांगितले.
राऊत यांच्यावर याप्रकरणी आता खटला चालविला जाणार आहे. ईडीच्या अटकेत असल्याने राऊत यांना व्हिडिओ कॉन्फर्नसिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी आर्थर रॉड कारागृहाला दिले होते. त्यानंतर राऊत यांना व्हिडिओ कॉन्फर्नसिंगच्या माध्यमातून शिवडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना त्यांच्याविरोधातील गुन्हा मान्य आहे का ? अशी विचारणा केली. त्यावर राऊत यांनी आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचे सांगितले. आता 19 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार