सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘अतिरेकी हिंदुत्वाचे प्रिय प्रतीक’ म्हणत घोर अवमान !

संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी या प्रकरणी तात्काळ माफीनामा जाहीर करावा आणि हे वृत्त मागे घ्यावे, तसेच अखिल हिंदु समाजाची जाहीर माफी प्रसिद्ध करावी, अन्यथा या प्रकरणी आपल्याला न्यायालयामध्ये खेचू, अशी चेतावनीही श्री. शिंदे यांनी या वेळी दिली. *सदर वृत्ताची लिंक* : https://thewire.in/communalism/by-attacking-the-mughals-adityanath-is-erasing-the-history-of-his-own-nath-sampraday

Snehal Joshi .
  • Oct 14 2020 10:42PM
‘द वायर’ या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर दिनांक ८ ऑक्टोबर रोजीच्या ‘By Attacking the Mughals, Adityanath Is Erasing the History of His Own Nath Samprady’ या मथळ्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि क्रिस्टीन मारेवा कारवोस्की या पत्रकार महिलेने लिहिलेल्या एका लेखात छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अवमान करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी ‘मुघल म्युझियम’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ असे करण्याची घोषणा केली, यावर टीका करणार्‍या या लेखात ‘छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे हिंदु राष्ट्रवादाच्या अतिरेकी हिंदुत्वाचे सर्वात आवडते प्रतिक’ असे म्हटले आहे. हे लिखाण अत्यंत निंदनीय असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करते. अवघ्या हिंदु समाजाला दैवतासमान असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अवमान करणार्‍या ‘द वायर’ या न्यूज पोर्टलचे संपादक, मालक आणि पत्रकार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे. श्री. शिंदे यांनी सांगितले की, या विरोधात मुंबईत विक्रोळी येथे श्री. प्रभाकर भोसले यांनी, तर अमरावती येथे श्री. रोशन मुळे यांनी, रायगड येथे श्री. रोहिदास शेडगे यांनी पोलीस तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीमध्ये ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन, सिद्धार्थ भाटीया, एम.के. वेणु आणि लेखिका क्रिस्टीन मारेवा कारवोस्की यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३ अ, २९५ अ आणि ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करावा आणि आरोपींना त्वरीत अटक करावी, असे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्याही प्रकारे केला गेलेला अवमान हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी या प्रकरणी तात्काळ माफीनामा जाहीर करावा आणि हे वृत्त मागे घ्यावे, तसेच अखिल हिंदु समाजाची जाहीर माफी प्रसिद्ध करावी, अन्यथा या प्रकरणी आपल्याला न्यायालयामध्ये खेचू, अशी चेतावनीही श्री. शिंदे यांनी या वेळी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार