सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली भेट

संभाजीनगर : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट घेतली.

Sudarshan MH
  • Jun 19 2021 6:45PM


*औट्रम घाटातील बोगदा संदर्भात १ लाख सह्यांचे निवेदन सुपूर्द*

संभाजीनगर : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) दरम्यान औट्रम घाटातील बोगदा संदर्भातसंघर्ष समितीचे १ लाख सह्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विकासासंदर्भात चर्चा केली.
राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत कन्नड-चाळीसगाव घाटातील बोगदा होणे गरजेचे आहे. याकरिता ६ हजार कोटीचा खर्च असून हा बोगदा खांन्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे या बोगद्याचे महत्व लक्षात घेता आपण या कामी व्यक्तीगत लक्ष द्यावे अशी विनंती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली. राज्य सरकार याकामी योग्य तो पाठपुरावा करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना दिली.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सचिव खासदार विनायक राऊत यांची उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार