सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

१ जूनपासून बाजारपेठा, उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी द्या

संभाजीनगर : जिल्ह्याभरात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बाजारपेठ व उद्योगधंदे यावर निर्बंध लावले आहे.

Sudarshan MH
  • May 31 2021 9:21AM


व्यापारी शिष्टमंडळाची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे मागणी

संभाजीनगर : जिल्ह्याभरात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बाजारपेठ व उद्योगधंदे यावर निर्बंध लावले आहे. यामुळे जवळपास ७८ दिवसांपासून व्यापाऱ्यांचा व्यवहार ठप्प झाला. त्यामुळे प्रशासनाने १ जूनपासून सर्वच व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या. तसेच वेळेत वाढ करा, अशी मागणी व्यावसायिक शिष्टमंडळ व व्यापारी महासंघाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे केली आहे.
पावसाळा सुरू झाल्याने  अनेक प्रलंबित कामे बाकी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना कमीतकमी दुपारी ४ वाजेपर्यंत वेळ वाढवून मिळावी. संचारबंदी काळात सील केलेले दुकानांना नाममात्र शुल्क आकारून सुरू करण्याची परवानगी द्यावी. अनेकांचा व्यवसाय बुडाल्याने मनपाचा मालमत्ता कराचे व्याज व दंड  कमी करावा. वीज बीलातसूट द्यावी, अशा विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.
यावेळी जिल्हा व्यापारी महसंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, मराठवाडा चेंबर असोसिएशनचे प्रफुल्ल मालाणी, महासचिव लक्ष्मीनारायण राठी, रोमी छाबडा, संजय डोशी, अनुप तोलवाणी, हरचरण सिंग, उदय साहुजी, सुनील किंगर, मोहम्मद अबरार, मोहम्मद दाऊद, रहीम खान, मोहम्मद याहया, मोहम्मद इस्माईल, शाकेर  अहमद, झाकेर अहमद आदींची उपस्थिती होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार