सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

**जिल्हा सामान्य रुग्णालय संभाजीनगर येथील प्राणवायू प्रकल्पाचे प्रतिकात्मक उद्घाटन भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केले **

संभाजीनगर :- कोरोणाच्या माहामारी मध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व जिल्ह्यांना सहा ते सात महिन्यापासून विविध उपाययोजना करण्यासाठी सुचवत आहे,

Sudarshan MH
  • May 11 2021 3:46PM

संभाजीनगर :- कोरोणाच्या माहामारी मध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व जिल्ह्यांना सहा ते सात महिन्यापासून विविध उपाययोजना करण्यासाठी सुचवत आहे, त्या उपायोजना स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन यांच्या अधिकार्‍यांनी करणे अपेक्षित आहे, परंतु **शासकीय काम आणि सहा महिने थांब**,या म्हणीचा प्रत्यय संभाजीनगर मधील जनता रोज घेत आहे ,केंद्र सरकारच्या योजना मधून मंजूर झालेले ऑक्सीजन प्लांट हे कागदावर टेंडर देऊन कागदपत्रे करण्याचा घाट प्रशासन करत आहे, असे नसते तर सहा महिन्यांपूर्वी एखाद्या शासकीय कामाचा आदेश निघून ते काम या प्रचंड मोठ्या महामारी मध्ये जर उपयोगी येत नसेल तर ,या शासकीय अधिकारी पदाधिकारी यांच्या दप्तर दिरंगाई मुळे व शासकीय काम आणि सहा महिने थांब या ध्येय धोरणामुळे संभाजीनगर जिल्ह्यामधील व मराठवाड्यामधील जनता मृत्यूच्या दरी मध्ये रोज लोटली जात आहे ,एखाद्या कामाचं भुमिपुजन करून लोकार्पण करण्यापर्यंत हे वेगाने होणे अपेक्षित असताना,मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय( मिनीघाटी)मधील प्राण वायू प्रकल्प हा मागील सहा महिन्यापासून अजून अस्तित्वातच आला नाही,तसेच  शासकिय वैदयकिय माहाविदयालय येथे उदयोगजगता कडून कोट्यावधी रूपयाचे सि.एस.आर.निधी शासनाला दिला,पंरतु  खाजगी प्राणवायु पुरवठा करणाऱ्या उदयोगपतीना आर्थीक फायदा व्हावा या माहामारीच्या काळा मध्ये घाटी प्रशासना व जिल्हा प्रशासनमधील काही आधिकारी आपले आर्थीक हित संबध जपत  आहे , त्या मुळे या मोठ्या प्रणवायु  प्रकल्पाला चा सर्वसामान्य जनतेसाठी काय उपयोग ? त्या मुळे सर्व सामान्य जनतेच्या जिवन मरणाशी निगडीत अतीशय महत्वाच्या प्रश्नावर  भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मा. संजय केनेकर यांनी दि 11 मे रोजी झोपलेल्या व झोपेचं सोंग घेतलेल्या  शासकीय अधिकारी, घाटी प्रशासन व  महाविकासआघाडी ला जागे करण्यासाठी सकाळी 11 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे  या प्राणवायु प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे (प्रतिकात्मक निषेद उद्धाटन)व या ठिकाणी शासनाचा निषेध केला,व प्रशासनाला जाबविचरला,तसेच संजय केणेकर म्हणाले जर पुढील आठ दिवसाच्या आत शासनाने हे प्रणणवायु प्रकल्प उभारले नाही तर भारतीय जनता पार्टी लोकशाही मार्गने ,कोरोणाच्या नियमाचे पालन करून तिव्र अंदोलन करेल,नाही तर मा.उच्चन्यायला मध्ये सर्व सामान्य गोर गरिब जनते साठी न्यायासाठी दार ठोठावेल,आसे देखील भाजप शहर अध्यक्ष्य मा.संजय केणेकर म्हणाले,तसेच मार्च महिन्या मध्ये जिल्हा सामान्य रूग्नालया मध्ये ऑक्सिजन च्या पुरवठा अनियमीत झाल्या मुळे चार रूग्नाना आपले प्रणगमवावे लागले,त्या सर्व सामान्य व्यक्तीच्या मुत्युस,जबदार  जिल्हा सामान्य रूग्नालय आहे,त्यांनी हे मुत्यू दडवले आहे,त्या मुळे या प्रकारणाची उच्चस्तरीय चैकशी करून मृत व्यकतीच्या नातेवाईकांना न्याय दयावा ही देखील मागणी संजय केणेकर यांनी केली आहे,यावेळी माजी.माहापौर बापु घडामोडे,सरचिटणीस राजु शिंदे,हाफिज शेख,चिकलठाणा मंडल अध्यक्ष संजय चौधरी,सौ.वर्षे सांळूके,आदि कार्यकरते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार