सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*विदेशातील 107 विद्यार्थ्यांचा विद्यापीठात प्रवेश*

संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना व ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे.

Sudarshan MH
  • Apr 10 2021 3:50PM



संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना व ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. या उपक्रमाचा फायदा विद्यापीठाला झाला असून 11 देशातील 107 विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध विभागात अध्यापन, संशोधनासाठी प्रवेश घेतला आहे. मध्यपूर्व अशिया देशातील विदेशती विद्यार्थ्यांचा पुर्वी औरंगाबादेत शिक्षणासाठी मोठा ओढा होता. माञ, मध्यतंरीच्या काळात विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.  या संदर्भात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी विदेशी विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना तसेच प्रवेश ते निकालापर्यंतची संपुर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याचा निर्णय घेतला होता. विदेशी विद्यार्थी कक्षाच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया मोहिम राबविण्यात आली. 2020-2021 या शैक्षणिक वर्षात एकूण 11 देशातील 107 विद्यार्थ्यांनी विविध विभागात तसेच संशोधनासाठी प्रवेश घेतला आहे. यामध्ये येमेनचे 89, आफगाणिस्ताान 1, कांगो 1, इराक 1, सीरीया 1, जॉर्डन 1, नेपाळ 1, सुदान 1, सोमालिया 7, थायलंड 2  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती विदेशी विद्यार्थी कक्षाचे संचालक डॉ.मुस्तजीब खान यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार