सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संभाजीनगर मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनाही कोरोनाची लागण*

संभाजीनगर : महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

Sudarshan MH
  • Apr 5 2021 6:17AM
संभाजीनगर : महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना काल शनिवारी काहीसा ञास जाणवू लागल्याने त्यांनी आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वँब दिला होता. त्यांचा आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. 
यापूर्वी, मागील पंधरा दिवसांत औरंगाबाद पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे हे प्रमुख अधिकारी कोरोना पॉझीटिव्ह निघाल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या प्रशासकीय कामावर झाला आहे. माञ आयुक्त पांडेय आता हेच कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे पालिकेचे कामकाज आणखी ढेपाळते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, पांडेय होम आयसोलेट होण्याच्या तयारीत असल्याचे सूञांनी सांगितले. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोडकर यांनी सांगितले की, आयुक्त पांडेय यांना काल ताप आल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी लगेच आरटीपीसीआरसाठी स्वँब दिला. त्यांचा अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला. माञ त्यांच्यात नॉर्मल सिम्टम्स् जाणवले आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. दरम्यान आयुक्त पांडेय यांनी त्यांच्या संपर्कातील सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केल्याचे सूञांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार