सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी

गोलवाडी येथे आयोजित समृद्धी महामार्ग आढावाची घेतली बैठक

Abhimanyu
  • Dec 5 2020 4:51PM


संभाजीनगर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी दोनच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या समावेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते.  यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा श्री. ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली.
गोलवाडी येथे आयोजित समृद्धी महामार्ग आढावा बैठकीत त्यांचे स्वागत  मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. तसेच यावेळी आमदार सर्वश्री अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, संजय सिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे,  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होते.
या आढाव्याच्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 बाबत सविस्तर सादरीकरण श्री.ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 कि.मी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनीही यावेळी प्रकल्पाची सद्यस्थितीबाबत माहिती दिली. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार