सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी डिव्हायडर तोडला

मुख्यमंत्र्यांचा ताफा पैठणकडे रवाना होणार आहे. या रोडवर दुभाजक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना वळसा घालावा लागू नये, म्हणून चक्क डिव्हायडर तोडण्यात आला आहे

Abhimanyu
  • Sep 10 2022 6:39PM
छ. संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ सप्टेंबर रोजी छ. संभाजी नगर दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त पैठण तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, वळसा घालावा लागू नये, म्हणून चक्क डिव्हायडर तोडण्यात आल्याचे समोर आले आहे. 

राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. चिकलठाणा विमानतळावरून बीड बायपास मार्गे नव्या सोलापूर-धुळे महामार्गावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा पैठणकडे रवाना होणार आहे. या रोडवर दुभाजक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना वळसा घालावा लागू नये, म्हणून चक्क डिव्हायडर तोडण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा छ. संभाजीनगर दौरा यशस्वी करण्यासाठी शिंदे गट कामाला लागला आहे. पैठणमध्ये शिंदे गटाकडून दौऱ्यानिमित्त नियोजन बैठका घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण असलेल्या सर्वच प्रमुख गावात शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहे.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार