सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संभाजी नगरात २ हजार ७०० लोकांना मिळणार थेट रोजगार, डीएमआयसीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

कॉस्मो फिल्म प्रा. लिमिटेड आणि पिरॅमल फार्मा प्रा. लि. या दोन कंपन्यांनी बिडकीनमध्ये केली दीड हजार कोटींची गुंतवणूक

Abhimanyu
  • Aug 8 2022 8:13PM
संभाजी नगर : डीएमआयसीच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात मोठा उद्योग यावा, यासाठी संभाजी नगर चे उद्योगविश्व तीन वर्षांपासून प्रतीक्षेत होते. रविवारी अखेर ही प्रतीक्षा संपुष्टात आली. कॉस्मो फिल्म प्रा. लिमिटेड आणि पिरॅमल फार्मा प्रा. लि. या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी बिडकीन औद्योगिक पट्ट्याला भेट दिली होती. त्यांना येथील इन्फ्रास्ट्रक्चर आवडल्याने या दोन्ही कंपन्यांनी येथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. कॉस्मो फिल्मकडून येथे १७८ एकर, तर पिरॅमल फार्मा कंपनीने १३८ एकर अशी एकूण ३११ जमीन खरेदी केली आहे. कॉस्मो फिल्मने विस्तारीकरण करण्यासाठी येथे टप्प्याटप्प्याने सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

 पिरॅमल फार्माकडून सुमारे ५०० कोटी रुपयांची येथे गुंतवणूक होणार आहे. या दोन्ही कंपन्यांमुळे अनुक्रमे १ हजार ५०० आणि १ हजार २०० असे एकूण २ हजार ७०० लोकांना थेट रोजगार मिळणार असल्याची माहिती डीएमआयसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही कंपन्या डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांचे उत्पादन सुरू करण्याची शक्यता आहे. या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे बिडकीन औद्योगिक पट्ट्याला प्रतीक्षेत असलेले अँकर प्रकल्प मिळाल्याने येथे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुमारे पाच हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

बिडकीन औद्योगिक पट्ट्यात मोठी गुंतवणूक असलेला उद्योग यावा,यासाठी केंद्र आणि राज्यसरकारसोबत सीएमआयएचे पदाधिकारी प्रयत्नशील होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार