सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रदीप जैस्वाल यांची महानगरप्रमुख पदावरून उचलबांगडी..

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मा. आमदार किशनचंद तनवाणी यांची शिवसेनेच्या महानगरप्रमुख पदी नियुक्ती

Abhimanyu
  • Aug 6 2022 1:51PM
संभाजीनगर : संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची शिवसेना महानगरप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून आता त्यांच्या जागी शिवसेनेने माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची शिवसेनेच्या  महानगरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदीप जैस्वाल  मागील सात वर्षांपासून शिवसेनेचे महानगरप्रमुख म्हणून काम करत होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले, त्यात आमदार प्रदीप जैस्वाल यांचाही समावेश होता.  

किशनचंद तानवाणी हे २०१९ साली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते, नंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले. परंतु आतापर्यंत त्यांची कोणत्याही पदावर वर्णी लावण्यात आली नव्हती. त्यामुळे काही दिवसांपासून ते पक्ष कार्यापासून दूर होते. आता शिंदे गटाच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीनंतर त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करण्याच्या दृष्टीने तनवाणी यांची महानगरप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार