माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे महापालिकेसमोर उपोषण
संभाजी नगर महापालिका राज्यात सर्वात जास्त कर आकारते अशी टीका कायम होत असते.
संभाजी नगर : सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दुपारी अचानक संभाजी नगर महापालिकेसमोर उपोषण सुरु केले आहे. तसेच मालमत्ता कर, पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. संभाजी नगर महापालिका राज्यात सर्वात जास्त कर आकारते अशी टीका कायम होत असते. कराच्या रक्कमेच्या तुलनेत सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. रस्ते, पाणी आणि कचरा याची समस्या काही केल्या सुटत नाही.
एकीकडे स्मार्ट सिटीचे काम आणि दुसरीकडे पायाभूत सुविधांसाठी नागरिकांची ओरड आहे. दरम्यान, शहरातील पायाभूत सुविधा आणि कर या विषय माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी हातात घेतला आहे. जाधव यांनी आज अचानक महापालिकेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. तसेच लोकप्रतिनिधी सिमेंट रस्तेच का बांधतात? पाण्याची टाकी का बांधत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
माजी आमदार जाधव यांनी अचानक सुरु केलेल्या उपोषणाची चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या आंदोलनामुळे जाधव देखील निवडणुकीत आपले समर्थक उतरवणार का? असेही चर्चा आता सुरु झाली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प