छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नव निर्वाचित खासदार संदीपान भुमरे साहेब यांनी श्री क्षेत्र वेरूळ येथे घेतली बाबाजींची कृतज्ञता पूर्व भेट भेटी दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून येण्यामध्ये बाबाजींचा व जय बाबाजी भक्त परिवाराचा लाख मोलाचा आशीर्वाद लाभला त्यामुळे अशक्य वाटणारी निवडणूक ही सोपी झाली, त्याबद्दल माननीय खासदार साहेबांनी आभार व्यक्त केले.
बाबाजींच्या सूचनेनुसार ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करताना प्रामुख्याने घृष्णेश्वर देवस्थान, मालोजीराजे भोसले गढी ,वेळगंगा घाट यासाठी विशेष कॉरिडॉर निर्माण करून त्याचा विकास करावा या सूचनेची वरिष्ठ पातळीवर ताबडतोब बैठक लावून प्रत्यक्ष कारवाईचा त्यांनी शब्द दिला पुढील कार्यासाठी परमपूज्य बाबाजींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.