सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गर्व से कहो.. हम इंजिनीअर है!

भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या स्वप्नातील भारताच्या उभारणीसाठी कल्पक अभियंत्यांची गरज समाजाला आहे हे तितकेच वास्तव आहे.

- रमेश कुलकर्णी ९९२२९०१२६२
  • Sep 19 2020 11:51AM
‘इंजिनीअरिंग’ या शब्दालाच सामाजिक वजन आहे. बहुतांश पालकांच्या आशा, आकांशा या शब्दाभवताल घुटमळत राहतात. उज्ज्वल भविष्याचे हे मजबूत प्रवेशद्वार आहे, असे स्वप्नरंजन करणारे समाजात जागोजागी भेटतात. साहजिकच सर्वाधिक स्कोप व ओढा असलेला ‘अभियांत्रिकी’ हा शब्द कायम आकर्षणाचा विषय आहे. म्हणूनच आपल्या पाल्याला कसेही करून इंजिनीअर बनविण्याची धडपड बहुतांश पालकांची सुरू असते. त्यासाठी किचकट प्रवेश परीक्षेची तयारी तथा प्रसंगी प्रवेशासाठी भरमसाठ पैसे मोजण्याची तयारी दर्शविली जाते. नुकताच अभियांत्रिकी दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला़ भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या स्वप्नातील भारताच्या उभारणीसाठी कल्पक अभियंत्यांची गरज समाजाला आहे हे तितकेच वास्तव आहे. प्रवेशाचा जीवघेणा टप्पा संपवून महाविद्यालयीन शिक्षणास सुरुवात केली जाते. अभियांत्रिकीचे महाविद्यालयीन शिक्षण अतिशय खडतर तथा वेगळेपणा जपणारे आहे. ‘सॉफ्ट रॅगिंग ते प्लेसमेंट’ या महाविद्यालयीन प्रवासात सेमिस्टर, सबमिशन, व्हायवा, प्रोजेक्ट आणि परीक्षा हे कायम सोबती असतात. अभियांत्रिकी हा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून गणला जातो. येथे ‘फिल्ड वर्क’ला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे. बहुतांश कॉलेजमध्ये शिकविणाºया प्राध्यापकांना कुठल्याही फिल्ड वा इंडस्ट्री कामाचा अनुभव नसतो अशी कायम ओरड अभियांत्रिकी विद्यार्थी करताना दिसतात. परंतु त्याकडे कायम दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळते़ डॉक्टर, वकील वा चार्टर्ड अकाउंटंट यांना इंटरनिशीपमध्ये प्रॅक्टिससाठी वेळ दिला जातो. परंतु इंजिनीअरांना तसा वेळ उपलब्ध होत नाही. अभियंत्यांकडून मात्र लगेच ‘परफेक्ट’ कामाची अपेक्षा केली जाते. त्यामुळे पुस्तकी ज्ञान ते प्रत्यक्ष अनुभव याची सांगड घालतांना तारेवरची कसरत अभियंत्यांना करावी लागते. जगाला सर्वाधिक इंजिनीअर पुरविणारा आपला भारत हा एकमेव देश आहे. ‘जे विकते तेच पिकते’ हाच मार्केटचा साधासरळ नियम आहे. महाराष्ट्रात आज जवळपास ३५० अभियांत्रिकी पदवी वा पदविका महाविद्यालये असावीत. दरवर्षी साधारणत: दीड लाख इंजिनीअर आपल्याकडे निर्मित होतात. सध्याची नोकºयांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे सर्वांना सामावून घेणे अशक्यप्राय गोष्ट आहे. बेरोजगारी हा तसा ही ज्वलंत मुद्दा आहे. यावर वेळीच उपाययोजना करून मार्ग काढणे गरजेचे आहे. इंजिनीअर हा संघटना विरहीत घटक असल्यामुळे त्यांचा एकत्रित आवाज मात्र ऐकायला मिळत नाही. अभियांत्रिकी हा मानवी जीवनाच्या जन्म ते मृत्यू या प्रवासातील अभिन्न घटक आहे. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा ते ऊर्जा, टेक्नॉलॉजी व इंटरनेट या वाढीव गरजापर्यंत अभियांत्रिकीची व्याप्ती आहे. संपूर्ण मानवी जीवनच अभियांत्रिकीने व्यापून टाकलेले आहे़ अभियांत्रिकीचा उगम तसा प्राचीन आहे. त्याला मोठा देदीप्यमान इतिहास आहे. अभियांत्रिकीशिवाय मानवी जीवनाची कल्पनाही केल्या जाऊ शकत नाही. इंजिनीअरिंग नसती तर हे जग कसे असते? या भयावह कल्पनेनेही थरकाप उठतो. दळणवळण ते संरक्षण, भूगर्भ ते अवकाश, मेडिकल ते मनोरंजन, संगणक ते डिजिटल सर्वच क्षेत्रे अभियांत्रिकीशिवाय अपुरे वा अधुरे आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर बदललेला जगाचा चेहरामोहरा आताच्या डिजिटल युगाने अधिकच आकर्षक केला आहे. कुठल्याही विकासाचा घट्ट पाया हा अभियांत्रिकीवरच उभारला जाऊ शकतो. कोरोना काळात अभियंत्यांनी केलेल्या कार्याचा हवा तसा गौरव झालेला दिसत नाही. वीजनिर्मिती ते व्हेंटिलेटर वा तत्सम महत्त्वपूर्ण बाबीच्या निर्मितीकरिता अहोरात्र झटणारे अभियंतेही कोरोनायोद्धेच आहेत. अर्थकारणाच्या रुतलेल्या चाकाला गती देण्याची ताकद या अभियंत्यामध्येच आहे. म्हणूनच अभियंत्यांचे कार्य अतुलनीय आहे. नेहमीच पडद्यामागची भूमिका असल्यामुळे समाजासमोर त्यांचे काम सहसा येत नाही. तल्लख बुद्धिमत्ता असण्यासोबत कल्पकतेचे धनी असणारे अभियंते कायम उपेक्षित राहतात. नावीन्याची कास धरून सातत्याने नवनिर्मितीची संकल्पना राबविणाºया अभियंत्यांचा गौरव होणे गरजेचे आहे. नव्या युगाचा प्रारंभच अभियंत्याच्या अभिनव कल्पनेतून शक्य होतो. अभियंता सुदृढ, संपन्न मानवी समाजाच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक घटक आहे. अभियंत्याच्या कार्यकुशलतेतून समाजाची संपन्नता वाढीस लागते. त्यामुळेच त्यांचा इंजिनीअर असण्याचा गर्व व अभिमान अतिशय रास्त आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळावरही अबाधित सत्ता गाजविणारे कष्टकरी तेवढेच कल्पक अभियंत्यांना म्हणूनच वंदन केले पाहिजे. आगामी काळात भारताला महासत्ता बनविण्याचा महामार्ग हे अभियंतेच तयार करतील यात कुठलीच शंका नाही. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार