सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपाचे प्रा. डॉ. रवीबापू चौधरी हे चंद्रकांत रघुवंशी यांना प्रतिआव्हान देण्याच्या तयारीत नगराध्यक्षांचा राजीनामा घेण्याची आफत ओढवणार का ?

चंद्रकांत रघुवंशी यांना प्रतिआव्हान देण्याच्या तयारीत नगराध्यक्षांचा राजीनामा घेण्याची आफत ओढवणार का ?

Nandurbar. MH
  • May 5 2021 9:22AM
सुदर्शन न्यूज केतन रघुवंशी. नंदुरबार
नंदुरबार, आम्ही नगराध्यक्षांना राजीनामा द्यायला सांगतो तुम्ही तुमच्या नगरसेवकांचा राजीनामा घेऊन दाखवा, हे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलेले आव्हान स्वीकारीत भारतीय जनता पार्टीचे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बापू चौधरी हे प्रतिआव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे सुदर्शन न्युज च्या सुत्रांद्वारे कळले आहे . यामुळे नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांचा राजीनामा खरोखर घेतला जाईल का ? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
       भारतीय जनता पार्टीच्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काल दिनांक 4 मे रोजी पुन्हा फेसबुक लाईव्ह करीत जाहीर स्पष्टीकरण दिले. खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलतांनाच माजी आमदार चंद्रकांंत रघुवंशी म्हणाले की, नगराध्यक्षा सौ
रत्नाताई रघुवंशी यांना अपात्र ठरवावे यासाठी डॉक्टर गावित परिवार प्रयत्न करीत आहे. परंतु मीच नगराध्यक्षा सौ. रघुवंशी यांना राजीनामा द्यायला सांगतो. तुम्हीपण तुमच्या 11 नगरसेवकांना राजीनामा देण्याचे सांगून बघा. नगराध्यक्षा सौ रघुवंशी माझे ऐकून राजीनामा तर देतीलच परंतु तुमचे नगरसेवक तुमच्या शब्दाला किती मानतात का बघा. भाजपाचे नगरसेवक हे चौधरी बंधूंचे नगरसेवक आहेत ते त्यांचे ऐकतील किंवा तुमचे यावर मी बोलू शकत नाही, असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले होते. 
     आता भारतीय जनता पार्टीचे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी हे यावर प्रतिआव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे सुदर्शन न्युजच्या सुत्रांकडून कळते. आपल्या सर्व अकराच्या अकरा नगरसेवकांना राजीनामा द्यायला सांगूच तथापि नगराध्यक्ष खरोखर राजीनामा देणार का व रघुकुल रीत ला जपणार का ? असा प्रश्न करणारी पहिली प्रतिक्रिया डॉक्टर रवींद्र बापू चौधरी यांच्या गटा तर्फे व्यक्त करीत असल्याचे कळले आहे. प्राप्त माहितीनुसार आव्हान स्वीकारत अकरा नगरसेवकांनी राजीनामा द्यायचा आणि चंद्रकांत रघुवंशी यांना त्यांचे संपूर्ण पेनल सहित नगराध्यक्षांचासुद्धा राजीनामा घ्यायला भाग पाडायचे आणि सरळ निवडणुकीला सामोरे जायचे, अशा दिशेने हालचाल सुरू केली असल्याचे समजते.
नंदुरबार जिल्ह्यातील शोषल मीडिया वोर आता बंगाल चुनव हिंसा व करोना पेक्षा ही जास्त लक्ष वेधून घेत असल्याने शहरातील लोकांना पुन्हा नगरपालिका इलेक्शन ला सामोरे जावे लागेल या चर्चेला आता उधाण आले आहे ,,

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार